34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रसोलापूरचे प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर यांची आत्महत्या

सोलापूरचे प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर यांची आत्महत्या

स्वत:वर गोळी झाडून संपविले जीवन
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत जीवन संपवले. प्राथमिक माहितीनुसार दोन राउंड फायर झाल्या. त्यातील एक गोळी डोक्याच्या आरपार गेली. मोदी परिसरात असलेल्या त्यांच्या घराच्या बेडरूममध्ये त्यांनी स्वत:वर गोळी झाडली. या घटनेने सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शहरातील नामांकित रुग्णालय वळसंगकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले. त्याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी अज्ञात कारणावरून रात्री ८.३० च्या सुमारास स्वत:च्या घरात असताना डोक्यात गोळी झाडून घेतली. यानंतर गोळीचा आवाज येताच बेशुद्धावस्थेत असलेल्या डॉ. वळसंगकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.

डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. केवळ सोलापूर, महाराष्ट्राचे नाही तर जगभरात त्यांनी विविध रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावली आहे. त्यांनी टोकाचे पाऊले का उचलले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. ज्या हॉस्पिटलमध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले, त्याच रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
डॉ. शिरीष वलसंगकर यांनी सोलापूर येथील डीबीएफ दयानंद कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्समध्ये शिक्षण घेतले आणि पदवी प्राप्त केली. विज्ञानाची पूर्व-पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर प्री-प्रोफेशनल उत्तीर्ण झाले आणि वैद्यकीय शिक्षण सोलापूर येथील डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केले. त्यांनी अनुक्रमे शिवाजी विद्यापीठ आणि लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमबीबीएस, एमडी आणि एमआरसीपी पदवी मिळवली. ते मराठी, कन्नड, इंग्रजी आणि हिंदी या चार भाषांमध्ये संवाद साधत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR