27 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeमहाराष्ट्रसौदी अरेबियातील नवदाम्पत्याने केले मतदान

सौदी अरेबियातील नवदाम्पत्याने केले मतदान

आडूळ : सौदी अरेबिया येथे दोन वर्षांपासून बिग डेटा इंजिनीअर म्हणून कार्यरत असलेल्या अजय पाटीलबा बोंद्रे यांनी आपल्या पत्नीसह देवगाव (ता. पैठण) या मूळगावी मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.

अजय बोंद्रे हा तरुण गेल्या दोन वर्षांपासून सौदी अरेबिया येथील हडूप अ‍ॅडमिनिस्ट्रेटर येथे बिग डेटा इंजिनीअर म्हणून नोकरीला आहे. ४ एप्रिल रोजी त्याचा कोमल यांच्याशी विवाह झाला. या विवाहासाठी ते एक महिन्याची रजा टाकून भारतात आले.

विवाहानंतर ते सौदी अरेबियाला रवाना होणार होते. परंतु, लोकसभेच्या निवडणुकीमुळे ‘व्हिजा’ची तारीख वाढवून घेतली. सोमवारी या नवदाम्पत्याने देवगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्याने लग्नासाठी घेतलेली एक महिन्याची रजा राष्ट्रीय कर्तव्यासाठी वाढवून दोन महिन्यांची केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR