24.7 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeलातूरस्थानिक आमदार निधीतून उभारले जाणार २६ बस थांबा शेल्ड

स्थानिक आमदार निधीतून उभारले जाणार २६ बस थांबा शेल्ड

लातूर : प्रतिनिधी
स्थानिक आमदार विकास निधीतून लातुर शहर विधानसभा मतदारसंघात उभारण्यात येणा-या प्रवाशी बस थांबा शेल्ड कामाचा शुभारंभ दि. २९ ऑगस्ट रोजी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाभळगाव येथील दयानंद माध्यमिक विद्यालयसमोर बाभळगावहून लातुरकडे येणा-या आणि लातुरकडून बाभळगावकडे जाणा-या, अशा दोन्ही बाजूने प्रत्येकी एक असे दोन बस थांबे उभारण्यात येणार आहेत.
 सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जे. के. असोसिएट्सकडून लातुर शहर विधानसभा मतदारसंघात २६ प्रवाशी बस थांबे (शेल्ड) उभारण्यात येणार असून यासाठी स्थानिक आमदार निधीतून १ कोटी २६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक बस थांब्यासाठी ७ लाख रुपयांची तरतूद आहे. यात महिला व पुरुष आणि विद्यार्थी यांच्याकरिता स्वतंत्र बेंचची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. यावेळी बाजार समिती सभापती जगदिश बावणे, उपसरपंच गोविंद देशमुख, विलास सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन रविंद्र  काळे, ट्वेन्टी वन शुगर्स व्हाईस  चेअरमन विजय देशमुख, चंद्रकांत मद्दे, गुरुनाथ ब्याळे, गिरीश ब्याळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR