38.9 C
Latur
Wednesday, April 30, 2025
Homeअंतरराष्ट्रीयस्पेस एक्सची व्यावसायिक मोहीम; अब्जाधिश अंतराळाच्या सफरीवर!

स्पेस एक्सची व्यावसायिक मोहीम; अब्जाधिश अंतराळाच्या सफरीवर!

फ्लोरिडा : वृत्तसंस्था
स्पेसएक्स कंपनीने आपल्या पहिल्­या व्यावसायिक मोहीमेचे यशस्वी प्रक्षेपण केले. या अंतराळ मोहिमेचे वैशिष्­ट्य म्­हणजे या यानातून पहिल्­यांदाच एका अब्­जाधिशाला सफर करण्यासाठी अंतराळात पाठवण्यात आले आहे. हे यान पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या वरून प्रदक्षिणा घालणार असून अंतराळ मोहिमांमध्ये हा मार्ग पहिल्­यांदाच वापरला जाणार आहे.

फ्लोरिडातील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून रात्री ९.४६ मिनिटांनी फ्रॅम २ नावाच्या मोहिमेंतर्गत हे यान प्रक्षेपित करण्यात आले. ३ ते ५ दिवस हे यान अंतराळात राहील. माल्टामध्ये राहणारे चिनी वंशाचे असलेले चुन वांग असे या प्रवास करणा-या अब्­जाधिशाचे नाव आहे. या प्रवासासाठी स्पेसएक्सला त्­यांनी अब्­जावधीची रक्­कम दिली आहे. त्­यांच्या बरोबर आणखी तीन सहकारी या यानातून प्रवास करणार आहेत. नॉर्वेजियन चित्रपट दिग्दर्शक जानिके मिकेलसेन, जर्मनीतील रोबोटिक्स संशोधक राबेया रॉग आणि ऑस्ट्रेलियन साहसी एरिक फिलिप्स. हे वांग यांचे सहकारी असणार आहेत.

फ्रॅम २ मोहिमेचे वैशिष्­ट्य म्­हणजे हे यान प्रतितास २८ हजार किलोमिटर इतक्­या वेगाने आपल्­या कक्षेत पोहचले आहे. या यानाला त्­याच्या कक्षेत पोहचवण्यासाठी स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटचा वापर केला गेला. लाँच झाल्­यानंतर हे रॉकेट दक्षिणेकडे झेपावले. दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवाकडे असा त्­याचा प्रवास असणार आहे. सर्व चार अंतराळयात्री पहिल्यांदाच अवकाश प्रवास करत आहेत.

अंतराळात काढणार एक्­स-रे
या मोहिमेतंर्गत मानावाच्या शरीरावर अंतरिक्ष प्रवासाचा होणा-या परिणामाचा अभ्­यास केला जाईल तर कमी गुरुत्­वाकर्षणाचा काय परिणाम मानवाच्या शरीरावर होतो यावरही संशोधन होईल. तसेच अंतराळात पहिल्­यांदाच एक्­स-रे काढला जाईल यातून सुक्ष्म गुरुत्­वाकर्षणामुळे मानाच्या हाडे व स्­नायूंवर काय परिणाम होतो याचा अभ्­यास होईल व्यायामाचा अभ्­यास या मोहिमेतील एक प्रयोग असणार आहे. या प्रयोगातून अंतराळात जास्­त वेळ घालवावा लागला तर स्­नायू व हाडे यांच्यावर काय परिणाम होतो व व्यायामाने त्­यामध्ये कसा फरक पडतो याचा अभ्­यास या प्रयोगातून होणार आहे.

अंतराळात उगवणार मशरुम
या मोहिमेंतर्गत एक प्रयोग आहे, ज्­यामध्ये अंतराळातील वातावरणात मशरुम कसे उगवता येतील याची पाहणी केली जाईल. यातून अधिक दिवसांच्या मोहिमेमध्ये अंतराळयात्रींना खाद्यपदार्थ तयार करणे व ते टिकवणे यांची अधिक माहिती मिळेल. तसेच हे अंतराळयात्री जेंव्हा ड्रॅगन यानातून पृथ्­वीवर परत येतील तेव्हा ते कोणत्­याही मदतीविना यानातून बाहेर कसे येतील याचा अभ्­यास केला जाईल. ज्­याद्वारे भविष्­यातील योजनासाठी याचा फायदा होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR