24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरस्वच्छतेतूनच सुख आणि समृद्धीचा मार्ग निघतो

स्वच्छतेतूनच सुख आणि समृद्धीचा मार्ग निघतो

लातूर : प्रतिनिधी
स्वच्छता केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर शहराच्या समृद्धीसाठी ही अत्यंत महत्वाची आहे. स्वच्छ शहर हे नंदनवन असते आणि तेथील नागरिक सुखी आणि समृद्ध असतात. लातूर शहरात स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता अभियानात सहभागी होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या पुढाकारतून आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय, लातूर आणि लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त्त विद्यमाने क्रीडा संकुल येथे स्वछता मोहीम राबविण्यात आली.
विलासराव देशमुख फाऊंडेशन, कृषी महाविद्यालय, लातूर, लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ जानेवारी रोजी क्रीडा संकुल येथे स्वछता मोहीम राबविण्यात आली.   टवेटीवन अ‍ॅग्री ली. च्या संचालीका सौ. आदिती अमित देशमुख, विलासराव देशमुख फाउंडेशन आणि ट्वेंटीवन अ‍ॅग्रीच्या माध्यमातून विविध सामाजीक, शैक्षणिक, स्वंयरोजगार संदर्भातील विविध उपक्रमांची अमंलबजावणी करीत आहेत. या अंतर्गत त्यांच्या संकल्पनेतून विलासराव देशमुख फाऊंडेशनने लातूर शहरात स्वच्छता अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लातूर येथील क्रीडा संकूल परीसरात कृषी महाविद्यालय, लातूर, लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त्त विद्यमाने स्वछता मोहीम राबविण्यात आली.
  विलासराव देशमुख फाउंडेशन आणि कृषी महाविदयालयाच्या विदयार्थ्यांनी जिल्हा संकूल परीसरात साफसफाई केली. परीसर साफसफाई नंतर विविध प्रकारची पथनाटये विद्यार्थ्यांनी सादर केली.  यावेळी उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, स्वच्छता उपायुक्त्त मनीषा गुरमे, व्हीडीएफ स्कूल ऑफ  व्हीडीएफ स्कूल ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. बालाजी वाकुरे, इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ मोहन बुके, विलासराव देशमुख फाउंडेशनच्या समन्वयक संगीता मोळवणे, व्हीडीएफ स्कूल ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य साखरे, कृषी महाविद्यालय लातूरचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, एनएसएस समन्वयक राहुल पिंड, प्रा.राजकुमार जाधव, पृथ्वीराज शिरसाठ, अविनाश देशमुख, एनएसएस समन्वयक फार्मसी सहाय्यक शेषगिरी एन गादा, पॉलिटेक्निकचे एनएसएस समन्वयक डॉ. शाहिद दारुगे, स्वच्छता अभियान समन्वयक श्विक्रम वाघमारे,  शिक्षक प्रमोद कुंभार, खलील  शेख, समीर पिस्के, ए. एस. अब्दारे, प्रा. डॉ. भामरे, प्रा. डा. कांबळे, प्रा. डॉ. जगताप, प्रा. मगर, प्रा.डा. धुप्पे, मल्लिकार्जुन वाघमारे, प्रा.  भुजबळ, प्रा. सिद्धंिलग गुजर, बंडू कोकाटे, गुणवंत बिराजदार,
लक्ष्मण मुखडे, बबन सगर,  उमाकांत घुले, प्रवीण गरड व महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR