37.8 C
Latur
Saturday, March 29, 2025
Homeमहाराष्ट्रस्वारगेट अत्याचारप्रकरणी तीन अधिकारी निलंबित

स्वारगेट अत्याचारप्रकरणी तीन अधिकारी निलंबित

एसटी महामंडळाची मोठी कारवाई

पुणे : प्रतिनिधी
स्वारगेट बस स्थानक परिसरात २५ फेब्रुवारीला पहाटे एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वरिष्ठ आगार व्यवस्थापक जयेश पाटील, कनिष्ठ आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील व स्थानक प्रमुख मोहिनी ढगे या तीन अधिका-यांचे निलंबन करण्यात आले आहे.

दरम्यान, पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात २५ फेब्रुवारी रोजी शिवशाही एसटी बसमध्ये एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. यासंदर्भात संबंधित महिलेने स्वारगेट पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित बस स्थानकावरील त्या वेळी कर्तव्यावर असलेल्या स्थानक प्रमुख तसेच त्या आगाराचे प्रमुख यांची याप्रकरणी प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल विभागनिहाय चौकशी करावी,

त्या चौकशीमध्ये ते दोषी आढळल्यास त्यांना तत्काळ निलंबित करावे, असे निर्देश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना दिले होते.
तथापि, यापुढे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत महामंडळाच्या कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना अशाच प्रकारच्या शिक्षेस सामोरे जावे लागेल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR