27 C
Latur
Sunday, December 29, 2024
Homeलातूरस्व. डॉ. मनमोहनसिंग यांना श्रद्धांजली 

स्व. डॉ. मनमोहनसिंग यांना श्रद्धांजली 

लातूर : प्रतिनिधी
थोर अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या(युपीए) सरकारमध्ये त्यांनी दोनवेळा पंतप्रधानपद भूषविले होते. त्यांच्या जाण्याने अर्थव्यवस्थेतील ‘सिंह’ हरपल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली असून त्यांना शहरात विविध ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतीक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी   दि. २७ डिसेंबर रोजी दुपारी  लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. तेथे  माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांनी  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच संचालक मंडळाने दोन मिनिटे स्तब्ध राहून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
रोहन क्रिकेट क्लबच्या वतीने डॉ. मनमोहनसिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कमलेश ठक्कर, भारत चामले, सिकंदर पटेल, महेश बेंबळे, सत्यजित देशमुख, अक्षय तांदळे, श्रीनिवास इंगोले, गणेश सूर्यवंशी, कैलास भूतडा, सूनील पोतदार, विकास निर्फळ, मुकेश राजेमाने, रितेश पटेल, सुधीर बाजूळगे, अशोक वाघमारे, प्रशांत देशपांडे आदी उपस्थित होते. येथील मांजरा महाविद्यालयात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग याना  शुक्रवारी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  भारताच्या राजकारणातील एक संयमी आणि ज्ञानी अर्थतज्ञ म्हणून त्यांचे अपूर्व योगदान दिले आहे. देशात खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यांचे धोरण स्वीकारून जागतिक व्यवस्थेत सहभागी होण्याचे काम डॉ. मनमोहन सिंग यांच्या कल्पकतेतून पार पडले आहे. असे मत  मांजरा  महाविद्यालयाचे  संस्थापक अध्यक्ष प्रा. पी. टी. पवार  यांनी मांडले.  याप्रसंगी संस्था सचिव डॉ. निलेश पवार, प्राचार्य डॉ. नरसिंग  येचाळे, डॉ. धर्मवीर बारसोळे , प्रा. अनुराधा देपे , प्रा. पूनम शिंदे, प्रा. अंजली हम्पल्ले, प्रा. शिल्पा जाधव, जनार्धन तपघाले, परमेश्वर शिंदे यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR