नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्रात सध्या पाणीटंचाईची भीषण परिस्थिती आहे. पाण्यासाठी कित्येक मैल पायपीट करणा-या आणि अनेक फूट खोल विहिरीत उतरणा-या महिला सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत काय? सरकारने फक्त योजना आणल्या पाणी नाही, असे म्हणत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यातले बोरिचिबारी गावातले फोटो व्हायरल करत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, एकीकडे राज्य सरकारकडून मिशन जलजीवन, जलयुक्त शिवार, हर घर नल अभियान राबवून पाणीप्रश्न कायमचा संपविण्यात येत असल्याचे सांगितले जाते तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यातलं बोरिचिबारी गावातले फोटो पाहून डोळ्यांत पाणी येते. पाण्यासाठी लाडक्या बहिणींना हंडाभर पाण्यासाठी दोन ते तीन किलोमिटर पायपीट करावी लागत असून महिलांची मोठी गर्दी येथील एका विहिरीवर दिसून येत आहे. ज्यांचं राजकारण केवळ लाडकी बहिण योजना आणि जलयुक्त शिवारच्या जाहिरातींवर चालतं, त्यांनी आता डोळे उघडून पहावं, असे पाटील यांनी म्हटलं.
महाराष्ट्रात सध्या पाणीटंचाईची भीषण परिस्थिती आहे. पाण्यासाठी कित्येक मैल पायपीट करणा-या आणि अनेक फूट खोल विहिरीत उतरणा-या महिला सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत काय? सरकारने फक्त योजना आणल्या पाणी नाही, असेही सतेज पाटील यांनी म्हटलं.