23.9 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeलातूरहत्तरगा हा. येथे अडीच एकर ऊस जळून खाक

हत्तरगा हा. येथे अडीच एकर ऊस जळून खाक

निलंगा : प्रतिनिधी

तालुक्यातील हत्तरगा(हा) येथील शेतक-याचा अडीच एकर ऊस शॉक सर्किट मुळे जळाल्याने सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले. उमेश शरणाप्पा माळी यांचे हत्तरगा (हा) गट क्र १३ घ मधील उसाचे २ लाख ९०,०००( दोन लाख नव्वद हजार हजार रूपयांचे नुकसान झाले तर विजयकुमार शरणाप्पा माळी १ लाख ५०,०००( एक लाख पन्नास हजार) रुपयाचे नुकसान झाले असल्याचा पंचनामा तलाठी बबन राठोड यांनी केला. शुक्रवारी सकाळी ११.३० दरम्यान शॉक सर्किट होऊन ऊस जळाला आहे. या घटनेमुळे संबधित शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शासनाने व महावितरण कंपनीने नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR