22.5 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeलातूरहमीभावापेक्षा कमी दरामुळे सोयाबीन उत्पादक संतप्त 

हमीभावापेक्षा कमी दरामुळे सोयाबीन उत्पादक संतप्त 

लातूर : प्रतिनिधी
खरीप हंगामातील सोयाबीन लातूरच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येऊ लागले आहे. हमीभाव ४८९२ रुपये प्रतिक्विंटल असताना सध्या शेतक-यांना ४७५० ते ४७४० रुपये दर मिळत आहे. हंगामाच्या प्रारंभीही हमीभावाएवढा दर मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. सोयाबीन उत्पादकांच्या रोषाचा फटका येत्या काळात सत्ताधा-यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लातूर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस पडला. सोयाबीनचे पीकही भरघोस आले आहे. मात्र सोयाबीन बाजारात येताच सोयाबीनच्या दरात घसरण सुरु झाली आहे. त्यामुळे आता सोयाबीनच्या दराचा प्रश्न निर्माण होतो आहे. मागील वर्षी सोयाबीनचा हमीभाव ४६०० रुपये प्रति क्विंटल होता. त्यात २९२ रुपयांची वाढ करुन यंदाच्या हंगामासाठी ४८९२ रुपये प्रति क्विंटल हमीभाव निश्चित करण्यात आला.  पेरणी, मजूरी, खते, औषधे, बियाणे आणि इंधनाच्या वाढलेल्या दरामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.
त्या तुलनेत २९२ रुपयांची वाढ तुटपुंजी आहे. तरीही यंदाच्या हंगामात हमीभावापेक्षा सरसरी १४२ ते १५२ रुपये कमी मिळत आहेत. सध्या बाजारात सोयाबीनची आवक कमी असतानाही ही परिस्थिती आहे. येत्या महिनाभरात आवक वाढल्यानंतर दरात आणखी घट होण्याचा अंदाज आ.े लातूर जिल्ह्यात खरीपाचे ५ लाखांपेक्षा अधिक क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ४० ते ४५ टक्क्यांवर सोयाबीनचा पेरा आहे. जिल्ह्यात सोयाबीन उत्पादकांची संख्या ब-यापैकी आहे. शनिवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत १४८२९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. त्यास कमाल ४७५० रुपये, ४७३० किमान तर ४७४० रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला. १४४ क्विंटल एवढी गव्हाची आवक झाली. गव्हास ३२०५ ते ३००० रुपये दर होता, रब्बी ज्वारीची आवक ६१८ क्विंटल तर दर ३१०० ते ३००० रुपये होता.  हायब्रीड ज्वारी आवक १२ क्विंटल होती.
त्यास २३५० ते २२५० रुपये दर मिळाला. पिवळी ज्वारीची आवक ८६ क्विंटल झाली. त्यास ३५०० ते ३४०० रुपये दर मिळाला. बाजरी १८ क्विंटल आली. त्याय २७०० ते २६०० रुपये दर होता. हरभ-याची आवक ४५५ क्विंटल झाली. दर ७२७५ ते ६८०० रुपये होता. तुर १०० क्विंटल आली. तुरीला १०६०० ते १० हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. मुगाची आवक २४४६ क्विंटल झाली. त्यास ८३३१ ते ७२०० रुपये दर मिळाला. उडीद ८२९१ क्विंटल आला. उडदाला ८२०१ ते ७७५० रुपये दर मिळाला. जवस १२ क्विंटल आवक झाली. त्यास ४५०० ते ४४०० रुपये दर होता. तिळाची आवक ९ क्विंटलवर होती. त्या १२५०० ते १२००० रुपये दर मिळाला. करडईची आवक १०८ क्विंटलवर होती. त्यास ४६०० ते ४५०० रुपये दर मिळाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR