20.3 C
Latur
Sunday, November 3, 2024
Homeमहाराष्ट्रहसन मुश्रीफ यांना केवळ खुर्ची हवी

हसन मुश्रीफ यांना केवळ खुर्ची हवी

रोहित पवारांचे टीकास्त्र

मुरगूड : शरद पवार यांनी इथल्या जनतेला न्याय देण्यासाठी हसन मुश्रीफ यांना ताकद दिली. तरीही ते त्यांना सोडून गेले. यावर तुम्हाला जायचं असेल तर जा. काही फरक पडणार नाही. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आमच्या विचारांबरोबर आहे, असे पवार यांनी सांगितले.पालकमंत्री मुश्रीफ यांना आता जनतेशी देणे-घेणे नाही तर त्यांना फक्त लाडकी खुर्ची हवी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली.

मुरगूड येथे समरजीत घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील होते. पवार म्हणाले, त्यांच्याजवळ पैसा, कॉन्ट्रॅक्टर, दादागिरी, मलिदा आहे. आमच्याजवळ शरद पवार व त्यांचे आदर्श विचार, निष्ठा, स्वाभिमानी जनता आहे. कागल, गडहिंग्लज, उत्तूरकरांनी यावेळी निष्ठेला, विचाराला ताकद द्यायची आणि गद्दारीला कोणत्याही परिस्थितीत गाडायचे ठरविले आहे. मला माहीत नाही की मुश्रीफांनी येथील जनतेला का पळून गेलो हे सांगितले आहे की नाही. मात्र इथल्या मातीने आपल्याला लढायला शिकवलं आहे, पळून जायला नाही. आम्ही लढलो, ते मात्र पळून गेले. मंत्रिपदासाठी त्यांनी पवार साहेबांच्या विचारांना बाजूला करून त्यांचा अपमान केला.

समरजीत घाटगे म्हणाले, पालकमंत्री कागलचा विकास केला म्हणतात, तर मग येथील जनतेला आरोग्य सेवेसाठी पुण्या-मुंबईला का जावे लागते. हे मंत्र्यांचे अपयश आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित पाटील म्हणाले, २५ वर्षांत विकासापेक्षा घरे फोडण्याचे तर नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले. त्यांच्या पराभवाचा विडा जनतेने उचलला आहे. याची जाणीव झाल्याने ते चुकीच्या भाषेचा वापर करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR