34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रहिंदीला विरोध मग इंग्रजीला का नाही?

हिंदीला विरोध मग इंग्रजीला का नाही?

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात आता पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला विरोध होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाला जाहीर विरोध केला असून, विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही आव्हान दिले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हा कोणता विचार आहे, अशी विचारणा केली आहे.

महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे, सर्वांनी ती शिकलीच पाहिजे. पण त्याच्यासोबत दुसरी एखादी भाषा शिकायची असेल तर ती भाषा शिकता येतो. मला तर आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोध मग इंग्रजीला का नाही? इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हा कोणता विचार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी मराठीला कोणी विरोध केला तर सहन करणार नाही हेदेखील स्पष्ट केले.
राज ठाकरेंच्या भूमिकेला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला असून, शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

इंग्रजी ही जगात बहुतेक अनेक देशांत चालते. त्यामुळे ती भाषाही आली पाहिजे. तिन्ही भाषांना महत्त्व आहे. पण शेवटी आपली स्वत:च्या मातृभाषेला पहिल्या क्रमांकाचे स्थान आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान अजित पवारांच्या या विधानावर मनसेचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी अजित पवारांना जर हिंदी राष्ट्रभाषा वाटत असेल तर त्यांनी पहिलीपासून धडे घेतले पाहिजेत. त्यांना पुन्हा शाळेत पाठवले पाहिजे असा टोला लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR