22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeअंतरराष्ट्रीयहिजबुल्लाहचा इस्रायलवर पलटवार! ३२० रॉकेट्स, ११ लष्करी तळांवर हल्ले

हिजबुल्लाहचा इस्रायलवर पलटवार! ३२० रॉकेट्स, ११ लष्करी तळांवर हल्ले

 

बैरूत : वृत्तसंस्था
लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने इस्रायलवर मोठा ड्रोन आणि रॉकेट हल्ला केला. गेले दोन दिवस इस्रायलने हिजबुल्लाला लक्ष्य करत लेबनॉनमधील अनेक भागांवर हल्ले केले होते. इस्रायलवरील हल्ल्यानंतर लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाने म्हटले आहे की त्यांनी बैरूतमध्ये मारल्या गेलेल्या कमांडर फुआद शुकरच्या हत्येचा बदला घेतला आहे. या हल्ल्यात इस्रायलच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे हिजबुल्लाहने म्हटले आहे.

हिजबुल्लाहने इस्रायलवर ३२० क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले. अल जजीराच्या वृत्तानुसार, इराण समर्थित संघटना हिजबुल्लाहने रविवारी ११ इस्रायली लष्करी तळांवर ३२० कात्युशा रॉकेट डागल्याचे सांगितले. हिजबुल्लाने आपला टॉप कमांडर फुआद शुकर याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केला. ३० जुलै रोजी इस्रायलच्या बेरूतमधील हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा टॉप कमांडर मारला गेला होता.

दुसरीकडे, हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलांट यांनी आणीबाणी जाहीर केली. राजधानी तेल अवीवमधील बेन गुरियन विमानतळ बंद करून सर्व इनकमिंग आणि आउटगोइंग फ्लाइट्स ९० मिनिटांसाठी थांबवण्यात आल्या. मात्र, नंतर सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या. लेबनॉन आणि इस्रायल यांच्यातील हे हल्ले अशा वेळी झाले आहेत, जिथे दुसरीकडे इजिप्तमध्ये गाझात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी बैठक सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR