28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयहिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह इस्रायली हल्ल्यात ठार, मुलीचा मृत्यू

हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह इस्रायली हल्ल्यात ठार, मुलीचा मृत्यू

 

बैरुत : वृत्तसंस्था
इस्रायल सातत्याने हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करत त्यांच्या अड्यांवर हवाई हल्ले करून, नायनाट करत आहे. यातच, आता इस्रायलने हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाह मारला गेल्याचा मोठा दावा केला आहे. इस्रायली संरक्षण दलाने एक्सवर पोस्ट करत, आता हसन नसराल्लाह जगात दहशत पसरवू शकणार नाहीत, असे म्हटले आहे. हसन नसरल्ला ३२ वर्षे हिजबुल्लाहचा प्रमुख होता.

इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, त्यांनी काल हिजुबल्लाहच्या हेडक्वॉर्टरवर हल्ला केला होता. तेथे हसन नसरल्लाह देखील उपस्थित होता. इस्रायली सैनिक बैरूतसह विविध भागांत सातत्याने हल्ला करत आहे. एवढेच नाही तर, आयडीएफने बैरूतच्या दहियाह शहरात राहणा-या नागरिकांना लवकरात लवकर हा भाग रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत.

नसराल्लाहशिवाय त्यांची मुलगी जैनबचाही या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इस्रायलने हल्ला केलेल्या कमांडर सेंटरमध्ये नसरल्लाहच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. यापूर्वी शुक्रवारी रात्री इस्रायलने हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र डागले होते, ज्यात ६ जणांचा खात्मा झाला होता, तर ९० जण जखमी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR