34.9 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रहे तर फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है

हे तर फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है

बारामती : प्रतिनिधी
निलेश लंके आता आपले नगरचे उमेदवार असणार आहेत. काल त्यांनी राजीनामा दिला. त्यांचे मन तिकडे रमत नव्हते. ते लोकांशी बोलले आणि त्यांनी मत बनवले. लोकांनी सांगितले की लोक शरद पवारसाहेबांसोबत आहेत. हे तर फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है… अनेक आमदार आमच्या आणि शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहेत. अनेकजण परत येण्यासाठी इच्छुक आहेत, असे आमदार रोहित पवार म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघात रोहित पवार यांचा प्रचार दौरा सुरू आहे. यावेळी स्थानिकांशी बोलताना रोहित पवारांनी हे विधान केले आहे.

बारामतीकडे देशाचे लक्ष
आपल्या इथल्या सामान्य लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. अनेक प्रश्न सुप्रिया सुळे यांच्या हातात आहेत. ते देखील सोडवण्यासाठी सुप्रिया ताईंनी प्रयत्न केला आहे. या मतदार संघात राज्यभरातून लोक येतात. ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. बारामती लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. बारामती ही फक्त पवारसाहेबांचीच आहे, असे रोहित पवार म्हणाले.

अ‍ॅडजेस्टमेंट झाली वाटतं; शिवतारेंना टोला
विजय शिवतारे यांचं नाव न घेता रोहित पवार यांनी टोला लगावला आहे. ते मध्ये फार बोलले. पण आता काही अ‍ॅडजेस्टमेंट झाली वाटतं…आता माघार घेतली असेल. पण आधी जे बोलला आहात ते व्हीडीओ आहेत की, असे म्हणत रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे विजय शिवतारे यांना खोचक टोला लगावला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR