मुंबई : वृत्तसंस्था
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने या आयपीएलमध्ये तिसरा विजय साकरला. मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना जखडून ठेवले असते आणि कॅच सोडल्या नसत्या आणि नो बॉल टाकले नसते तर हैदराबादच्या एवढ्या धावाही झाल्या नसत्या. पण तरीही मुंबईने हैदराबादला १६२ धावांत रोखले. मुंबईच्या संघाने हे आव्हान सहजपणे पूर्ण करत हैदराबादला धूळ चारली आणि सामना चार विकेट्स राखून जिंकला.
तिलक वर्माने यावेळी २१ आणि हार्दिक पंड्याने २१ धावांची खेळी साकारली. मुंबईचा संघ १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि रोहित शर्माने संघाला जोरदार सुरुवात करून दिली. रोहितने दमदार तीन षटकार लगावले आणि त्याने सर्वांची मने जिंकली. त्यानंतर मुंबई संघाने जोरदार फटकेबाजी करीत विजय साकारला.