हो, खैरेंना ऑफर दिली होती : संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीआधी मला शिंदे गटाकडून ऑफर होती, संजय शिरसाट यांनी माझ्याकडे काही माणसं पाठवली होती. तर भाजपाने देखील राज्यपालपदाची ऑफर दिल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काल केला होता. यावर राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. हो, खैरेंना आम्ही ऑफर दिली होती, अशी कबुलीच त्यांनी दिली आहे. खैरे यांनी तेव्हा आमची ऑफर स्वीकारली असती तर ते खासदार असते, असेही शिरसाट म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध उद्धवसेना असा संघर्ष सध्या जोरात सुरू आहे. पक्ष फोडल्यानंतर आता स्थानिक नेते, पदाधिका-यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिवसेना शिंदे गट सक्रिय झाला आहे. माजी महापौरांसह, पदाधिकारी, शिवसैनिकांना पक्षात घेत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला हादरे देण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू आहे. आणखी दहा ते बारा माजी नगरसेवक लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूने रोज एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काल लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडून ऑफर होती, असा दावा करत खळबळ उडवून दिली होती. यावर संजय शिरसाट यांनी खैरेंच्या दाव्याची पुष्टी केली आहे. हो, नक्कीच आम्ही तेव्हा लोकसभेची निवडणूक असल्याने चंद्रकांत खैरे यांना ऑफर दिली होती. शिवसेनेतील ते ज्येष्ठ नेते आहेत, आम्हाला पक्ष वाढवायचा असल्याने तेव्हा आम्ही त्यांना आमच्या पक्षाकडून लोकसभा लढवण्याची विचारणा केली होती.

चंद्रकांत खैरे यांनी तेव्हा आमची ऑफर स्वीकारली असती आणि लोकसभेची निवडणूक लढवली असती तर ते आज खासदार असते. मात्र, त्यावेळी त्यांनी आमची ऑफर नाकारली आणि आज त्यांना माजी खासदार म्हणून फिरावे लागत आहे. ऑफर नाकारल्यामुळे त्यांच्याच विरोधात आम्हाला लोकसभेची निवडणूक लढवावी लागली. संदिपान भुमरे हे लोकसभा लढले आणि जिंकले देखील, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून आपल्याला खासदार पदाची तर भाजपाकडून राज्यपाल पदासाठी ऑफर आली होती. लोकसभा निवडणूक होण्याआधी शिवसेना शिंदे गटाने माझ्याकडे काही माणसे पाठवून मला उमेदवारीची ऑफर दिली होती. असे खैरे म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41

Latest news