हो, मी नाराज !

नाशिक : प्रतिनिधी
मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा कालपासून रंगत होत्या. अखेर आज (१६ डिसेंबर) त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन त्यांची नाराजी उघड केली. भुजबळ म्हणाले, मी नाराज आहे. पुढे काय? ज्यांनी मला डावलले त्यांना तुम्ही (प्रसारमाध्यमं) प्रश्न विचारायला हवेत .
दरम्यान, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे (अजित पवार) आणि महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळल्याने त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे.

छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आले की तुम्हाला पक्षाने, महायुतीतील नेत्यांनी मंत्रिपदापासून का डावलले? त्यावर भुजबळ म्हणाले, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय नि फेकले काय कोणाला काय फरक पडतो. आयुष्यात मंत्रिपद किती वेळा आले आणि किती वेळा गेले, परंतु हा छगन भुजबळ संपला नाही. तुम्ही मंत्रिपदावरून मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांनी डावलले त्यांना विचारायला हवे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अजित पवारांच्या अभिनंदनाचे, नव्या मंर्त्यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग ठिकठिकाणी लागले आहेत. त्यावर भुजबळांचा फोटो छापलेला नाही. त्यावरून भुजबळांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, कधी कधी होर्डिंगवर जागा नसते.

दरम्यान, त्यांना विचारण्यात आले की तुम्ही पक्षावर नाराज आहात का? यावर भुजबळ म्हणाले, होय, मी नाराज आहे. पुढे काय करणार? मी पुन्हा सांगतो मी नाराज आहे. यावर त्यांना विचारण्यात आले की तुमचे अजित पवार (पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष), सुनील तटकरे (पक्षाचे प्रदेशाध्यक्ष) यांच्याशी काही बोलणे झाले आहे? यावर भुजबळ म्हणाले, मला त्याची काही आवश्यकता वाटली नाही.

समर्थकांनी रस्ता रोको
येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील विंचूर इथे छत्रपती संभाजीनगर-नाशिक राज्य मार्गावर अर्धा तासच्या भुजबळ समर्थकांनी रस्ता रोको आंदोलन केले. भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलण्याचा निषेध समर्थकांनी केला. भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. बुलडाणा इथल्या सिंदखेडराजा इथं ओबीसी समाजाच्यावतीने शहरातून मोर्चा काढत नागपूर-पुणे या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Jalkot|घागरदऱ्यात हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी हजारोंची गर्दी
01:40
Video thumbnail
BREAKING : लातूरकरांनो सावधान! मांजरा धरणाची पाणीपातळी चिंताजनक!
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गार! गांधी चौकात होणार महाआंदोलन
04:20
Video thumbnail
Nanded|पाऊस नाही, पिके करपली! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी
01:44
Video thumbnail
Nanded|हातात लग्नाचा बॅनर घेऊन तरुण टॉवरवर! कौटुंबिक त्रासाचा आरोप | लोह्यात खळबळ
00:46
Video thumbnail
Nanded|गणरायाचं विसर्जन करायचं कुठे? नांदेडमध्ये नदी-खदानी कोरड्या | महापालिकेसमोर संकट
02:26
Video thumbnail
Latur|खरगे यांच्या अवमानाविरोधात पुरोगामी संघटना एकवटल्या! गांधी चौकात निषेध सभा
03:14
Video thumbnail
Latur|जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुण टॉवरवर! रेणापूरच्या कोरेगावातील आंदोलन
02:04
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55

Latest news