लातूर : प्रतिनिधी
क्रीडा प्रेमीसाठी पर्वणी असलेले ग्रामीण टी १० क्रिकेट सामने १० मे २०२५ पासून सुरु होणार होते मात्र हे सामने स्थगित करण्यात आले असल्याची माहिती आयोजन समितीकडून देण्यात आली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने प्रतीवर्षी ग्रामीण टी १० सामने तालुका व जिल्हा स्तरावर खेळवले जात आहेत. २०२५ मधील सामन्याची तयार लातूर जिल्ह्यातील विविध तालूक्यात मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती मात्र भारताच्या सिमेवर वाढलेल्या तणावामुळे वाढत्या राष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचे क्रिकेट सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या निर्माण झालेल्या भारत पाकिस्तान युध्दजन्य परिस्थितीत आपल्या सशस्त्र दलाचे, अधिका-यांचे मनोबल वाढवणे व नागरिकांची सुरक्षा सर्वोच्चस्थानी असायला हवी म्हणून ग्रामीण टी १० क्रिकेट सामने स्थगित करण्यात आले आहेत, असे आयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.