29.7 C
Latur
Tuesday, June 3, 2025
Homeलातूर११० नाल्यांची स्वच्छता; २२६९ मेट्रिक टन गाळ उचलला

११० नाल्यांची स्वच्छता; २२६९ मेट्रिक टन गाळ उचलला

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सून पूर्व नाले सफाईचे काम दि. १ मे रोजी हाती घेण्यात आले असून या अंतर्गत शहरातील लहान-मोठ्या १५२ नाल्यांपैकी ११० नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. या अंतर्गत शहरातून २२६९ मेट्रिक टन गाळ उचलण्यात आला आहे.
लातूर शहरात ६८ मोठे व ८४ छोटे, असे एकूण १५२ नाले आहेत. मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेअंतर्गत दि. १ मेपासून या नाल्यांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी ४ मोठे जेसीबी, छोटे ४ जेसीबी, १ पोकलेन व ८ हायवाचा वापर केला जात आहे. मागील काळात ११० नाल्यांची स्वच्छता पूर्ण झाली आहे. उर्वरित ४२ नाल्यांची सफाई दि. ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन मनपाने केले आहे.
या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी व हे काम अधिक गतीने पूर्ण करून घेण्यासाठी मनपाच्या वतीने ४ मुख्य स्वच्छता  निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सोबतीला १८ स्वच्छता निरीक्षक नेमण्यात आले आहेत.  साफसफाईसाठी ३५० स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत शहरातील नागरिकांनी मनपाच्या  ०२३८२-२५५५८५ या क्रमांकावर तसेच १८००२३३१३८८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR