27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूर११ साखर कारखान्यांकडून ऊसाचे गाळप होणार

११ साखर कारखान्यांकडून ऊसाचे गाळप होणार

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयातील ११ साखर कारखान्यांचा ऊसाचा गाळपाचा हंगाम सुरू होणार आहे. या ११ साखर कारखान्यांच्या कडून २३ लाख ६५ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी ऊसाचे बागायती क्षेत्र पाण्याभावी मोडले गेल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मेच क्षेत्र म्हणजे ३५ हजार ३८९ हेक्टर क्षेत्र ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आसणार आहे. त्यामुळे यावर्षी ऊस गाळप व साखर उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत कमीच राहणार आहे.
लातूर जिल्हयात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्हयाच्या भूजल पातळीत ब-यापैकी घट झाली. त्यामुळे ब-याच शेतक-यांनी ऊसाचे बागायत क्षेत्र मोडीत काढले. ज्या शेतक-यांकडे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध होते, अशा शेतक-यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून ऊसाचे पिक जोपासले आहे. कृषि विभागाच्या अहवालानुसार व साखर कारखान्यांच्याकडील नोंदी असा ३५ हजार ६८९.५० हेक्टर क्षेत्रावरील ऊस यावर्षी गाळपासाठी उपलब्ध होणार  आहे. या उपलब्ध ऊसाचे नोव्हेंबर पासून साखर कारखान्याकडून  गाळप सुरू होत आहे. त्यासाठी ११ साखर कारखान्यांनी गाळपाचे परवाने घेतले आहेत. यावर्षीच्या गाळप हंगामाची जिल्हयात सुरूवात झाली आहे.
जिल्हयात गेल्यावर्षी ६ सहकारी व ५ खाजगी साखर कारखान्यांनी अशा ११ साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम पार पडला. यात विलास २ तोंडार या साखर कारखाना, विलास सहकारी साखार कारखाना, रेणा सहकारी साखर कारखाना, जागृती शुगरचा साखर कारखाना, सिध्दी शुगर लि. साखर कारखाना, संत शिरोमणी मारूती महाराज सहकारी साखर कारखाना, ट्वैटीवन शुगर साखर कारखाना, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना, श्री साईबाबा शुगर लि. साखर कारखाना, शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना, शेतकरी सहकारी साखर कारखाना यांनी ४९ लाख ४० हजार ७२१ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ५२ लाख ८० हजार ६१२ क्विंटल साखरेची निमिर्ती करत १०.२६ असा साखर उतारा घेतला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR