25.4 C
Latur
Monday, March 3, 2025
Home१४ कोटी वर्षांपूर्वीचा खजिना झारखंडमध्ये

१४ कोटी वर्षांपूर्वीचा खजिना झारखंडमध्ये

रांची : वृत्तसंस्था
झारखंडमध्ये भूवैज्ञानिकांच्या हाती एक मोठा आणि अजब खजिना हाती लागला. अनेक दिवसांपासून या नैसर्गिक संपत्तीच्या मागे वैज्ञानिक तहान भूक हरपून लागले होते. झारखंड येथील एका मोठ्या विशाल वृक्षाच्या खाली वैज्ञानिकांना खजिना सापडला. हा खजिना जवळपास १४.५ कोटी वर्षांपूर्वींचा आहे. बरमसिया नावाच्या गावात एका पेट्रीफाईड जीवाश्माचा शोध लागला आहे.

झारखंड मध्ये भूवैज्ञानिकांच्या हाती एक अनोखा खजिना लागला आहे. ही नैसर्गिक संपत्ती जवळपास १४.५ कोटी वर्षांपूर्वीची असल्याचे सांगण्यात येत आहे. भूवैज्ञानिक डॉ. रंजीत कुमार सिंह आणि वनविभागाचे अधिकारी रामचंद्र पासवान यांच्या चमूने हा शोध लावला. मंगळवारी पाकूड जिल्ह्यातील बरमसिया गावातील एका डेरेदार मोठ्या झाडाखाली वैज्ञानिकांना पेट्रोफाईड जीवाश्म सापडले.

या शोधामुळे या परिसरात पर्यटनाला चालना मिळू शकते. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस मिळेल. या साईटवर भू-वैज्ञानिक, पर्यावरण शास्त्राचे संशोधक आणि इतर संशोधकांना संशोधनासाठी वाव मिळेल. पर्यावरण, जैव विविधतेसाठी आणि निसर्गाचे विविध पैलू उलगडण्यासाठी हे संशोधन बहुमोल ठरणार आहे.

पेट्रीफाईड जीवाश्म
ही साईट इतर डोंगररांगापेक्षा एकदम वेगळी आहे. डॉ. रणजीत कुमार सिंह यांच्या म्हणण्यांनुसार, पाकूड जिल्हा हा पेट्रोफाईल जीवाश्मांचा खजिना आहे, या जीवाश्माने तो समृद्ध आहे. विज्ञान शाखेत रूची असणा-या हजारो सर्वसामान्य नागरिकांना हा नैसर्गिक खजिना पाहता येईल. पण त्यासाठी त्याचे संवर्धन, जतन करणे आवश्यक आहे. या परिसरात नवीन संशोधन होणे गरजेचे आहे. तसेच नैसर्गिक संपत्तीवरील अतिक्रमण रोखणे गरजेचे आहे. या क्षेत्राचे संरक्षण आणि जतन करण्याची गरज असल्याचे डॉ. रणजीत कुमार सिंह म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR