31.6 C
Latur
Sunday, April 27, 2025
Homeराष्ट्रीय१४ स्थानिक अतिरेक्यांची पाकला मदत

१४ स्थानिक अतिरेक्यांची पाकला मदत

जम्मू : वृत्तसंस्था
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. यानंतर गुप्तचर यंत्रणांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या १४ स्थानिक दहशतवाद्यांनी यादी जाहीर केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २० ते ४० वयोगटातील हे दहशतवादी पाकिस्तानातील दहशतवाद्यांना हत्यारे आणि घुसखोरीसाठी सक्रीयपणे मदत करीत आहेत.

सुरक्षा यंत्रणांनी ओळख पटवलेले हे १४ दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहमद या ३ प्रमुख पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचे वृत्त आहे. यापैकी ८ लष्कर-ए-तोयबा आणि प्रत्येकी ३ जैश-ए-मोहम्मदव हिज्बुल मुजाहिदीनशी संबंधित आहेत.

सुरक्षा यंत्रणांनी ओळख पटवलेल्या स्थानिक दहशतवाद्यांमध्ये आदिल रहमान डेंटू (२१), आसिफ अहमद शेख (२८), अहसान अहमद शेख (२३), हरीस नजीर (२०), आमिर नजीर वानी (२०), यावर अहमद भट, आसिफ अहमद खांडे (२४), नसीर अहमद वानी (२१), शाहिद अहमद कुटे (२७), अदबीर अहमद दारान (२७), जुबेर अहमद वानी (३९), हारुन रशीद गनई (३२) आणि झाकीर अहमद गनी (२९) यांचा समावेश आहे. हे सर्व जण वेगवेगळ््या दहशतवादी संघटनांसाठी काम करत असल्याचे समोर आले आहे.

हल्ल्याचा मास्टरमाईंड
आदिलची ओळख पटली
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या आदिल अहमद ठोकरची ओळख पटली. तो २०१८ मध्ये पाकिस्तानला गेला होता. तिथून तो ६ वर्षांनी ३ ते ४ दहशतवाद्यांसह माघारी परतला. आदिल जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहराच्या गुर्रे गावचा रहिवासी आहे. तोच या हल्ल्याचा मास्टरमाईंड मानला जातो. सुरक्षा दलांकडून त्याच्यासह साथीदारांचा शोध सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR