१५ ऑगस्टपूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा पहिला हप्ता येण्याची वाट पाहणा-यांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकताच खात्रीलायक सूत्रांकडून मोठी माहिती मिळाली. त्यानुसार, १५ ऑगस्टपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचे पैसे येण्याची दाट शक्यता आहे. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहि­णींच्या निधीचे थेट हस्तांतरण करण्याचा अंतिम निर्णय होऊ शकतो.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये दिले जातात. हे पैसे महिलांच्या बँक खात्यात ट्रान्सफर होतात. ई-केवायसी न केल्याने अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाली नाहीत. यासोबतच महिला व बालकल्याण विभागाकडून महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे.

ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत, त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. आयकर विभागाच्या मदतीने अर्जांची छाननी केली जातंय. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून काही नियम आणि अटी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावेळी महिलांनी सरसकट अर्ज केली आणि ती अर्ज पात्रही ठरवण्यात आली.
आतायापूर्वीच जून महिन्याचा हप्ता १५ जुलै रोजी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला. १० तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होईल, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निधी वर्ग केला जात आहे. जर १८ ऑगस्टपर्यंत हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नाही तर मग थेट रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून महिलांच्या खात्यात थेट ३००० हजार जमा होऊ शकतात.
लाडकी बहीण योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला. इ केवायसी लागू करण्यात आली. ८० लाख महिला यानंतर या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. ८० लाख महिलांच्या कागदपत्रात त्रुटी निघाल्याने या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या नाहीत. त्यामध्येच आता जुलै महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
11:29
Video thumbnail
Latur|पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
04:24
Video thumbnail
Nanded|बिलोलीत आयशर चालकाला बेदम मारहाण! VIDEO व्हायरल
01:12
Video thumbnail
Nanded|शिवणी आरोग्य केंद्रात डॉक्टरच नाहीत? 100-150 रुग्णांची गैरसोय
01:58
Video thumbnail
Latur|ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची मागणी
05:21
Video thumbnail
Latur|लातूर जि.प. अध्यक्षांच्या बंगल्यात चोरी; पोलिसांसमोर मोठं आव्हान
06:55
Video thumbnail
Latur|पिकं संकटात, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न; छावा संघटनेचं उपोषण
10:32
Video thumbnail
Nanded|घंटानादाने सरकारला जागं करण्याचा प्रयत्न; नांदेडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन
03:04
Video thumbnail
Nanded|दौरे नकोत, शेतकऱ्यांना मदत द्या’; रोहित पवारांची सरकारकडे मागणी
02:48
Video thumbnail
Latur|रेणापूर तालुक्यातील शेरा, समसापूर, गव्हाण येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी
02:12
Video thumbnail
Nanded|पलंगावर झोपला अन् विषारी सापाने दंश केला; १७ वर्षीय रिहानचा मृत्यू
01:46
Video thumbnail
Dharashiv Rain Update|वाशीत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय, तेरखेड्यात गारपीट
01:20
Video thumbnail
Rohit Pawar|‘मोबाईलवर खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा’; रोहित पवारांचा संताप
05:26
Video thumbnail
Rohit Pawar|रोहित पवारांसमोर शेतकऱ्याचा हंबरडा; अश्रूंनी मांडली व्यथा
02:01
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
04:49

Latest news