31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूर१५ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप

१५ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप

लातूर : योगिराज पिसाळ

लातूर जिल्हयात यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आसला तरीही जोमात असलेल्या ऊसाची तोडणी सुरू आहे. गेल्या महिण्याभरापासून जिल्हयातील ११ साखर कारखान्यांनी १४ लाख ६१ हजार १३५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून १३ लाख १६ हजार ९५० क्विंटल साखरेची निमिर्ती केली असून ९.०१ असा साखर उतारा मिळाला आहे. लातूर जिल्हयात सरासरी ७९१.६० मिमी पाऊस पडतो. तो यावर्षी ५४० मिमी म्हणजेच तो वार्षीक सरासरीच्या ६९.१८ टक्के पाऊस झाला आहे. जिल्हयाच्या भूजल पातळीत घट असतानाही शेतक-यांनी सुक्ष्म सिंचनाचा वापर करून ऊसाचे पिक जोमदारपणे जोपासले आहे. कृषि विभागाच्या अहवालानुसार गेल्यावर्षी शेतक-यांनी ६४५.४० हेक्टर क्षेत्रावर आडसाली (जून-जुलै) ऊसाची लागवड केली. पूर्व हंगामी (ऑक्टोबर-नोव्हेबर) ११ हजार ८०६.८० हेक्टरवर लागवड, डिसेंबर ते जानेवारी दरम्यान १० हजार ६६०.०५ हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली. तर तोडणी झालेला ३१ हजार १४३.२९ हेक्टर क्षेत्रावरील खोडवा ऊसाची शेतक-यांनी जोपासना केली आहे. तसेच साखर कारखान्यांच्याकडील नोंदी असा ६३ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रावरील ऊस यावर्षी गाळपासाठी उपलब्ध झाला आहे. या ऊसाची ११ साखर कारखान्याकडून तोडणी गेल्या महिनभरापासून सुरू आहे. मात्र पन्नगेश्वर शुगरचा गळीत हंगाम यावर्षी सुरू झाला नाही.

यावर्षी सर्वाधिक उसाचे गाळप विलास सहकारी साखर कारखान्याने २ लाख २ हजार ६० मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून २ लाख ४ हजार ४४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जागृती शुगरने २ लाख ८२० मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून १ लाख ७६ हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याने १ लाख ८८ हजार ३० मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून १ लाख ३४ हजार ९५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. सिध्दी शुगर लि. या साखर कारखान्याने १ लाख ८१ हजार ९०५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून १ लाख ६७ हजार १०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. ट्वैटीवन शुगरने १ लाख ७० हजार ३९६ मेट्रीक टन करून १ लाख ५६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. विलास २ तोंडार या साखर कारखान्याने १ लाख ६९ हजार ९९० मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून १ लाख ८६ हजार ५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. रेणा सहकारी साखर कारखान्याने १ लाख ६८ हजार ८३० मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून १ लाख ५१ हजार १५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. संत शिरोमणी मारूती महाराज सहकारी साखर कारखान्याने ७१ हजार ३२५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ६४ हजार ८४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखान्याने ६६ हजार १० मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ४६ हजार ९४५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.श्री साईबाबा शुगर लि. या साखर कारखान्याने ३४ हजार २९९ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून २७ हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. शेतकरी सहकारी साखर कारखाना, किल्लारी या साखर कारखान्याने ७ हजार ४७० मेट्रीक टनऊसाचे गाळप करून १ हजार ३७५ क्ंिवटल साखरेचे उत्पान केले. तर साखर उतारा ७.११ असा राहिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR