लातूर : प्रतिनिधी
वैद्यकीय उपचार, मानवी भावना आणि सामाजिक एकात्मतेचा संगम असलेला मातृत्वाचा आगळावेगळा रौप्य महोत्सवी सोहळा लातूर शहरातील सुप्रसिद्ध के. जी. एन. टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटलच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार विभागाचे अतिरिक्त आयुक्त फैय्याज अहेमद शेख यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहूणे म्हणुन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, पोलिस उपाधिक्षक गजानन भातलवंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, आर. एस. मोदी आदी उपस्थित होते. गेल्या २५ वर्षांपासून वंध्यत्वावर मात करुन मातृत्वाचे स्वप्न साकार करणा-या १५ हजारांहून अधिक दाम्पत्यांपैकी प्रातिनिधीक दाम्पत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
के. जी. एन. टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटलचे संस्थापक तथा फर्टिलिटी तज्ज्ञ डॉ. अमीर शेख यांनी आपल्या भाषणात या प्रवासातील संघर्ष, तांत्रिक प्रगती आणि रुग्णांच्या सहकार्याबद्दल भावना व्यक्त करताना आम्ही रुग्णांना केवळ उपचार देत नाही, तर त्यांना एक नवसंजीवनी देतो, असे सांगीतले. विशेष प्राविण्यासह एमबीबीएस उतिर्ण झाल्याबद्दल डॉ. फिरदोस अमीर शेख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास के. जी. एन. टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटलचे रुग्ण दाम्पत्य, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.