छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
येथे एक अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. ‘एक तर तू माझ्याबरोबर राहा, नाही तर तुझ्या जावेशी माझे जुळवून दे’ भावकीतील एका १९ वर्षीय मुलाने ३६ वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. नकार दिल्यानंतर नराधमाने महिलेच्या अंगावर कटरने वार केले. यात महिलेला २८० टाके घालावे लागले. सव्वादोन फुटांचा एक वार मानेपासून मांडीच्या खालपर्यंत आहे.
पीडिता अल्पभूधारक शेतकरी असून मजुरी करते. त्यांना ११ वर्षांची दोन जुळी मुले आहेत. मरणयातनांपेक्षा भयंकर वेदना सहन करीत ही महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
अभिषेक तात्याराव नवपुते ( १९, रा. घारदोन ) असे आरोपी नराधमाचे नाव आहे.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या तोंडावर घटनेचा लवलेशही नव्हता. न्यायालयाने नराधमाला तीन दिवसांनी पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडिता अल्पभूधारक शेतकरी असून मजुरी करते. सासरप्रमाणेच त्यांच्या माहेरची परिस्थितीही अत्यंत हलाखीची आहे.