31.4 C
Latur
Thursday, April 17, 2025
Homeउद्योग१ मेपासून तांदळावर नवीन टॅरिफ लाईन!

१ मेपासून तांदळावर नवीन टॅरिफ लाईन!

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
१ मे पासून तांदळाच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारकडून नवीन टॅरिफ लाइन सिस्टीम लागू केली जाण्याची शक्यता आहे. वाणिज्य मंत्री जतिन प्रसाद यांनी संसदेत ही माहिती दिली. प्रसाद म्हणाले की, केंद्र सरकार नवीन टॅरिफ लाइनसाठी ही प्रणाली तांदूळ-आधारित प्रक्रियेच्या आधारावर तसेच जीआय टॅग असलेल्या बासमती तांदूळ आणि इतर जातींच्या आधारावर लागू होणार असल्याचे ते म्हणाले.

१० राज्यांमध्ये भाताचे वाण : वाणिज्य मंत्री जतिन प्रसाद यांनी एका लेखी उत्तरात म्हटले आहे की, या नवीन निर्णयामुळे वस्तूंचे भौगोलिक संकेत (नोंदणी आणि संरक्षण) कायदा, १९९९ अंतर्गत परिभाषित आणि मान्यताप्राप्त २० हून अधिक जीआय तांदळाच्या जातींना फायदा होईल. हे भारतातील १० हून अधिक राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये घेतले जाणारे तांदळाचे प्रकार आहेत. त्यांनी सांगितले की, १९७५ च्या सीमाशुल्क शुल्क कायद्यात सुधारणा करून नवीन शुल्क वस्तू तयार करण्यात आल्या आहेत. २९ मार्च २०२५ रोजी पारित झालेल्या वित्त कायदा २०२५ द्वारे हे लागू होईल.

तथापि, तापमानात वाढ झाल्यामुळे, गहू पिकाच्या टप्प्यात आणि उष्णता सहनशील जातींमध्ये फरक असल्याने २०२०-२१ च्या तुलनेत २०२१-२२ मध्ये सरासरी गहू उत्पादकतेत कोणतीही घट झाली नाही. गेल्या १० वर्षांत, देशातील ६० टक्क्यांहून अधिक गव्हाची लागवड उष्णता सहन करणा-या जातींनी केली जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR