29.9 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeक्रीडा२२ मार्चपासून आयपीएलचा थरार

२२ मार्चपासून आयपीएलचा थरार

मुंबई : प्रतिनिधी
आयपीएलच्या नव्या हंगामांचे वेळापत्रक आज जाहीर झाले असून, येत्या २२ मार्चपासून आयपीएलचा थरार पाहायला मिळणार आहे. यात पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेन्नई येथे खेळवला जाणार आहे. आयपीएल स्पर्धेचे पहिल्या टप्प्यातील २१ सामन्यांचे शेड्युल जाहीर झाले आहे. दुस-या टप्प्यातील शेड्युल लोकसभा निवडणुकांच्या तारखांनंतर जाहीर होणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात २२ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान २१ सामने खेळवले जाणार आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणूक आणि आयपीएलची रणधुमाळी एकत्र येत असल्याने सरकारसोबत आयपीएल आयोजकांचे बोलणे सुरू आहे.जूनमध्ये टी-ट्वेंटी विश्वचषक पार पडणार आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा मे अखेरपर्यंत संपेल.विश्वचषकामुळे आयपीएलचा अंतिम सामना २६ मे रोजी असू शकतो. टी-ट्वेंटी विश्वचषकात भारताचा सलामीचा सामना ५ जून रोजी होणार आहे. १ जूनपासून टी-ट्वेंटी विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.

दरम्यान, आयपीएलचे सामने दरवर्षी होतात. त्यामुळे दर ५ वर्षांनी निवडणुका आणि आयपीएल यांचे वेळापत्रक एकाचवेळी येते. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी आयपीएलचा थरार दक्षिण आफ्रिकेत झाला होता. यानंतर २०१४ च्या निवडणुकीवेळी अर्धे सामने यूएईमध्ये रंगले होते. मागील २०१९ च्या निवडणुकीवेळी आयपीएल स्पर्धा भारतामध्येच झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR