मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडमध्ये असे काही स्टार आहेत ज्यांनी रुपेरी पडद्यावर एकत्र काम केले होते. मात्र, अचानक एकमेकांसोबत काम करण्यास नकार दिला. त्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा देखील समावेश आहे. दोघांनी ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या चित्रपटात काम करत चाहत्यांची मने जिंकली होती. मात्र, १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमानंतर शिल्पाने अक्षयसोबत काम न करण्याची शपथ घेतली होती. आता शिल्पाने ही शपथ मोडली आहे.
‘मैं खिलाडी तू अनाडी’ चित्रपटाच्या सेटवर अक्षय आणि शिल्पामध्ये जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण शिल्पाने अक्षयवर आरोप केले होते की ‘त्याने केवळ माझा वापर केला. दुसरी कोणी तरी मिळाली म्हणून त्याने मला सोडून दिले.’ त्याच वेळी शिल्पाने शपथ घेतली होती की ती कधीही अक्षयसोबत पुन्हा काम करणार नाही. पण आता जवळपास ३० वर्षांनंतर अक्षय आणि शिल्पाला एकाच मंचावर, एकाच ड्रेसकोडमध्ये पाहून सर्वांना धक्का बसला आहे. तसेच दोघांनी केलेल्या डान्सची विशेष चर्चा रंगली आहे.
शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार हे नुकतेच एका पुरस्कार सोहळ्याला पोहोचले होते. दोघेही मंचावर एकत्र बसले होते. दोघांनी एकत्र परफॉर्म केला. पांढ-या रंगाच्या कपड्यांमध्ये दोघांनी ‘चुरा के दिल मेरा गोरिया चलीं’ या गाण्यावर डान्स केला. या गाण्याची हुक स्टेप झाल्यावर अक्षयने शिल्पाला स्पर्श केला. तेव्हा शिल्पा अक्षयचा हात बाजूला करून हात जोडून झाला संपला डान्स असे बोलताना दिसत आहे. त्यांचा हा डान्स करतानाचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.