कोटा (राजस्थान) : वृत्तसंस्था
बँकेत ठेवलेले पैसे सुरक्षित असतील, असा प्रत्येक ग्राहकाचा विश्वास असतो. मात्र राजस्थानातील कोटा येथील आयसीआयसीआय बँकेतील एका महिला अधिका-याने ग्राहकांच्या या विश्वासाचा घोर गैरफायदा घेत, तब्बल ४.५८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.
साक्षी गुप्ता असे या महिला अधिका-याचे नाव आहे. ती आयसीआयसीआय बँकेत रिलेशनशिप मॅनेजर पदावर कार्यरत होती. तिला पोलिसांनी अटक केली आहे. बँकेतील विविध मुदतठेवी मोडून तीने सुमारे ४१ खात्यांमधून हे पैसे परस्पर काढले. आणि ते शेअर बाजारात लावले. पण त्यातही तिचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, २०२० ते २०२३ या कालावधीत साक्षी गुप्ता हीने ‘यूजर ऋऊ लिंक’चा गैरवापर करून ४१ ग्राहकांच्या ११० खात्यांतून हे पैसे परस्पर काढले. या रकमेस शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठा नफा मिळवण्याचा तिचा हेतू होता. मात्र, शेअर बाजारात मोठे नुकसान झाल्यानंतर ती ही रक्कम परत करू शकली नाही.
साक्षी गुप्ताने फसवणुकीसाठी ग्राहकांच्या खात्यांशी संलग्न मोबाईल क्रमांक बदलले व त्याऐवजी आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नंबर जोडले. त्यामुळे मूळ खातेधारकांना व्यवहाराबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. इतकेच नव्हे, तर डळढ यंत्रणाही आपल्या संगणकावर सेट करून तिने डळढ स्वत:कडे घेतले, असे तपास अधिकारी इब्राहीम खान यांनी सांगितले.
एका ग्राहकाने आपल्या ऋऊ च्या चौकशीसाठी बँकेत येऊन माहिती घेतल्यानंतर ही बाब समोर आली. त्यानंतर बँकेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी साक्षी गुप्ताला तिच्या बहिणीच्या लग्नात येऊन अटक केली असून, सध्या साक्षी गुप्ताची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कउकउक बँकेने अद्याप याबाबत अधिकृत निवेदन केलेले नाही. मात्र, बँकेतील अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार ज्यांचे नुकसान झाले आहे त्या ग्राहकांना भरपाई दिली जाईल, असे संकेत मिळाले आहेत.