७ जूनपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा

निलंगा :  प्रतिनिधी
तालुक्यातील मुदगड, एकोजी, सरवडी व कोकळगाव येथील शेतक-यांनी शेतीसाठी पूर्ववत ८ तास वीजपुरवठा देण्याची मागणी करीत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.  सध्या शेतीसाठी मिळणारा वीजपुरवठा ८ तासांवरून कमी करून ५ तास करण्यात आल्याने पिकांना वेळेवर पाणी देणे कठीण होत असून शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. ५ तासांचा वीजपुरवठा अपुरा पडत असल्याने शेतीची कामे विस्कळीत होत आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे ८ तास नियमित वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.
 या संदर्भात महावितरण प्रशासनाने शेतक-यांच्या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान पुढील तीन दिवसांत प्रश्न मार्गी लागला नाही तर दि. ७ जूनपासून मुदगड येथील महावितरण उपकेंद्रावर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा शेतक-यांनी दिला आहे. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास अथवा शेतक-यांचे नुकसान झाल्यास त्यास महावितरण प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर देवानंद मुळे, अनंत इंगळे, विशाल मुंडे , श्रीकांत मुळे , अनंत मोहिते पाटील, विशाल मुळे , रमेश हराळे, तात्याराव मुळे, महेश मुळे आदी शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|अतिरिक्त फीस किंवा शैक्षणिक साहित्याची सक्ती केल्यास कारवाई. तृप्ती अंधारे ऍक्शन मोडवर.
03:22
Video thumbnail
Latur|ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
01:31
Video thumbnail
Latur Zp|ऑनलाईन प्रणाली बंद, तरीही लातूर जिल्हा परिषदेचे आर्थिक व्यवहार सुरू
01:55
Video thumbnail
Latur|आरटीओ अधिकाऱ्यांवर 35 हजारांची लाच मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.
03:19
Video thumbnail
Latur|राजीव नगरमध्ये तुंबलेल्या नाल्यांमुळे दुर्गंधीचं साम्राज्य;नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
02:50
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये खत-बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची गर्दी;खरीप तयारीला वेग...
02:21
Video thumbnail
धाराशिव: पवनचक्की प्रकल्पातील साहित्य चोरणारी टोळी गजाआड; १० गुन्हे उघड, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
01:12
Video thumbnail
परभणीत मान्सूनपूर्व वादळाचा धुमाकूळ;मांडाखळीत फळबागा उद्ध्वस्त, वीज खांब कोलमडले, झाड कोसळून बैल ठार
01:18
Video thumbnail
Latur|आमदार आणि आमदार पुत्राच्या त्रासाला कंटाळलेले दोन शेतकरी एकमत डिजिटल स्टुडिओमध्ये
11:51
Video thumbnail
अधिक महिन्यामुळे पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी; चंद्रभागा नदीपात्राला पार्किंगचे स्वरूप
02:00
Video thumbnail
लातूरमध्ये भाविकांच्या श्रद्धेला तडा; कोट्यवधींचा निधी पळवणारे किशोर महाराज शिवणीकरांवर गुन्हा दाखल!
06:19
Video thumbnail
Latur|अखेर किशोर महाराज शिवणीकर उर्फ ‘पिस्तुल्या महाराज’ यांच्यावर गुन्हा दाखल
04:45
Video thumbnail
उदगीर-जळकोट महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेनंतर CNG ऑटोचा स्फोट, रिक्षा जळून खाक, चालक बचावला
00:36
Video thumbnail
Latur|महेश देशमुख इतिहास रचतील;माजी मंत्री आमदार अमित देशमुखांचा दावा
03:49
Video thumbnail
जिंतूर-परभणी महामार्गावर भीषण अपघात; आजी, आजोबांसह १२ वर्षांचा नातू जागीच ठार
01:53

Latest news