औसा : प्रतिनिधी
औसा येथील जनता दरबारातून राज्यातील महिला बचत गटांचा प्रश्न मिटला असून औसा तालुक्यातील राजमाता जिजाऊ महिला बचत गट संघटनेच्या वतीने (दि.१८) जून रोजीच्या जनता दरबारात हा प्रश्न उपस्थित केला होता. मागील काही दिवसापासून अंगणवाडी आहार पुरवठा हा बचत गटाच्या माध्यमातून पुरवला जात होता त्याचे टेंडर भरण्यात येत होते व या टेंडरमुळे हजारो महिलांचे नुकसान होणार होणार होते. ई टेंडर प्रक्रिया रद्द करण्याचे निवेदन देण्यात आले होते. अवघ्या काही दिवसात आ अभिमन्यू पवार यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून ई टेंडर प्रक्रिया रद्द करून महाराष्ट्रातील हजारो महीला भगिनीचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवला आहे.
राज्याचे महिला व बाल विकास विभागाचे सहसचिव वि. रा. ठाकूर यांनी अंगणवाडीतील ३ ते ६ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना गरम व ताजा आहार पुरवठ्याच्या अनुषंगाने बचत गटाच्या मागण्या उच्चस्तरीय समितीपुढे सादर करण्यात यावेत असे निर्देश असल्याने सद्यस्थितीत सुरू असलेल्या सर्व निविदा प्रक्रियेस स्थगिती देण्यात आल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
औसा येथील या जनता दरबारात औसा तालुक्यातील राजमाता जिजाऊ बचत गट संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुनीता सुर्यवंशी, उपाध्यक्षा शालूबाई मोतीबने, सचिव उषा भोजने यांच्यासह महिलांनी यांनी सन २००७ पासून औसा तालुक्यातील करजगाव येथील अंगणवाडीत नियमित खंड न पडू देता विना तक्रारी गरम ताजा बाला पोषण आहार नियमित पुरवठा केलेला आहे. सदर कार्यकाळात अंगणवाडी सेविका मदतनिस संपावर गेल्या असता आम्ही बालपोषण आहार पुरवण्यात कोणताही कसुर न करता बाल पोषण आहारचा नियमित पुरवठा चालु ठेवलेला आहे.