30.9 C
Latur
Wednesday, February 19, 2025
Homeलातूरअंतेश्वर सिंचन योजनेस लवकरच मान्यता

अंतेश्वर सिंचन योजनेस लवकरच मान्यता

चाकूर : प्रतिनिधी
अहमदपूर-चाकूर मतदार संघातील प्रस्तावित अंतेश्वर उपसा सिंचन महत्वाक्षीं योजनेच्या प्रशासकीय मान्यतेसंदर्भात बैठक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (गोदावरी मराठवाडा व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांचे समवेत व जलसंपदा विभागातील अधिकारी यांची मंत्रालय, मुंबई येथे पार पडली असून लवकरच प्रशासकीय मान्यंता मिळेल अशी माहीती मंत्री बाबासाहेब पाटील (सहकार) यांनी दैनिक एकमतशी बोलताना दिली आहे.
सदर योजना ही दोन टप्यात होणार असून पहिला टप्पा अंतेश्वर उच्च पातळी बंधारा ते रुद्धा बंधारा व दुसरा टप्पा रुद्धा बंधारा ते प्रस्तावित झरी साठवण तलाव असून सदरील योजनेच्या पाणी उपलब्धता प्रमाणपत्रास मुख्य अभियंता, जलवज्ञिान व धरण सुरक्षितता, नाशिक यांनी मंजुरी दिली आहे. सदरील योजनेच्या उर्ध्वगामी नलिकेचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे तसेच मुख्य अभियंता (जलसंपदा) छ.संभाजीनगर यांनी योजनेतील धरण, बंधारा व पंपगृहाच्या सर्वेक्षण व अन्वेषण करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( गोदावरी मराठवाडा व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ),जलसंपदा विभाग यांनी अवर्षण प्रवण क्षेत्रातील या योजनेच्या प्रशासकीय मान्यता प्रस्ताव शासन मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या व सदर योजनेच्या अंमलबजावणी करीता सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन मंत्री बाबासाहेब पाटील यांना बैठकीत देण्यात आले.
या बैठकीकरीता जलसंपदा विभागाचे दिपक कपूर (भाप्रसे), अप्पर मुख्य सचिव, डॉ.संजय बेलसरे, सचिव (लाक्षेवि), संतोष तिरमनवार, कार्यकारी संचालक (गो.म.पा.वि.मं.) , छ.संभाजीनगर, विजय घोगरे मुख्य अभियंता (जलसंपदा) छ.संभाजीनगर, ईलियास चिस्ती,अधीक्षक अभियंता, महेंद्र काळे, कार्यकारी अभियंता व मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR