सोलापूर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा विकास होत आहे. त्यातही भाजपचे सरकार आल्यापासून विकास निधीची कोणतीही कमतरता भासत नाही. रस्ते हे विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत. त्यासाठी प्रत्येक गावात रस्ता होणे आवश्यकच आहे. अंत्रोळी तालुक्यातही रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. हे गाव विकासाचे मॉडेल व्हावे याचा आपण ध्यास घेतला आहे असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
अंत्रोळी (ता. द. सोलापूर) येथे अंत्रोळी ते विंचूर रस्ता २ कोटी ६५ लाख, अंत्रोळी नळ पाणीपुरवठा १ कोटी ७० लाख, अंत्रोळी ते गुंजेगाव रस्ता १ कोटी १५ लाख इत्यादी विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, डॉ. चनगोंडा हविनाळे, मळसिद्ध मुगळे,सरपंच माया सलगरे, कंदलगाव सरपंच शारदाकडते आदींची उपस्थिती होती. आमदार देशमुख पुढे म्हणाले की, गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे यात महिलांचाही सहभाग गरजेच आहे. महिलांनी आता आत्मनिर्भर व्हावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे.
महिलांचाही गावाच्या विकासात मोठा हातभार लागावा ही अपेक्षा आहे. यावेळी मैनोद्दीन पठाण, चंद्रकांत कोकरे,आनंदा करवे, अप्पासाहेब शेजाळ, साखर करपे, शिवाजी थोरात,नंदकुमार करपे,अनिल ढवळे,गजीनाथ शेजाळ,गौरीशंकर मेंडगुडले, सुनील नांगरे,दिपाली व्हनमाने, यतीन शहा व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.