मुंबई : एका भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने कारला भीषण अपघात घडला. या अपघातात कार चालकाने उड्डाण पुलावरील बाईक स्वार तिघा जणांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. यासोबतच कारचालक लक्ष्मण शिंदे हेदेखील मृत्यू पावले.
अंबरनाथ शहराच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणा-या उड्डाण पुलावर शुक्रवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पूर्व भागातून पश्चिम भागात जाणा-या एका भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने त्याने बाईक स्वारांना अक्षरश: चिरडले. या भीषण अपघातात ३ बाईक स्वार जागीच ठार झाले आहेत तर या जोरदार धडकेत कारचालकही ठार झाला. यातील एक बाईकस्वार या धडकेत उड्डाण पुलावरून उडून ब्रिजच्या खाली पडला आहे. या सगळ््या अपघाताचा व्हीडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यात एकूण ३ जखमी आहेत.

