28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअकोल्यात वादळी पावसामुळे २० मेंढ्या दगावल्या

अकोल्यात वादळी पावसामुळे २० मेंढ्या दगावल्या

अकोला : पश्चिम विदर्भात रविवारी (ता.२६) रात्री आलेला वादळी वारा, जोरदार पावसाने खरीपातील पिके तसेच भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हा पाऊस रबी पिकांसाठी दिलासा देणारा मानल्या जात आहे. अनेक मंडलांमध्ये अतिवृष्टीचीही नोंद झाली आहे. बाळापूर तालुक्यात २० मेंढ्या दगावल्या.

रविवारी रात्री विजांच्या कडकडासह वादळी पावसाने धुमाकूळ घातला. अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची कमी-अधिक प्रमाणात हजेरी लागली. सोमवारी (ता.२७) सुद्धा अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. हवामान खात्याने या भागात २६ ते २८ नोव्हेंबर या काळात पाऊस, गारपिटीचा इशारा आधीच दिला होता.

अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात उरळ बुद्रूक जवळील टाकळी गावात गारपीट व पावसामुळे मेंढ्या दगावल्याची माहिती मिळाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लाखनवाडा येथील शालिग्राम तुकाराम बिचकुले हे या भागात शेळ्यामेंढया चराईसाठी आलेले आहेत. रविवारच्या पावसामुळे त्यांच्या २० मेंढ्या दगावल्या असून, पाच ते सहा मेंढ्या गंभीर जखमी आहेत.

रबीसाठी फायदेशीर
रविवारी रात्री झालेला पाऊस प्रामुख्याने रबीसाठी फायदेशीर ठरणार आहे. परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी लागवड रखडत चालली होती. सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रात पेरणी सुरू होती. ज्यांनी थोड्या ओलीच्या आधारे पेरणी केली अशा शेतातील उगवण झालेल्या हरभ-याला हा पाऊस नवसंजीवनी देणारा ठरेल. सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने रखडलेल्या रब्बी पेरण्यासुद्धा आता वेग घेतली. काही प्रमाणात कोरडवाहू कपाशी पिकालाही याचा फायदा होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR