22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeसोलापूरअक्कलकोट शहरात कुत्र्यांवर विषप्रयोग

अक्कलकोट शहरात कुत्र्यांवर विषप्रयोग

अक्कलकोट : अक्कलकोट शहरात मोकाट वावरणाऱ्या जवळपास शंभर कुत्र्यांवर विष प्रयोग झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात कुत्रे मृत्यू पावल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल आता पाल निमल वेल्फेअर फाउंडेशन या प्राणी मित्र संघटनेने घेतली असून शहरातील प्राणीप्रेमी ही आक्रमक झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे. यातील काही कुत्र्यांनी जरी चावा घेतलेला असला तरी त्याचा बंदोबस्त अन्य मार्गाने करण्याची सोय सरकारने केली असताना अशा पद्धतीने प्राण्यांना मारणे हे अत्यंत चुकीचे
असल्याची प्रतिक्रिया शहरवासीयातून व्यक्त होत आहे.

शहरात वेगवेगळ्या चौकांमध्ये आणि गल्लीमध्ये कुत्रे हे मोठ्या प्रमाणात तडफडून मरत आहेत. त्यांच्या तोंडातून काळी लाळ बाहेर येत आहे. ही घटना शहरात सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर प्राणीमात्रावर प्रेम करणाऱ्या युवकांनी एकत्र येत नगरपालिका आणि पशुवैद्यकीय विभाग गाठले. त्याची चौकशी केली. मात्र या दोन्ही विभागाकडून आम्हाला याबाबत काहीच कल्पना नसल्याचे सांगण्यात आल्याने तरुण चांगलेच आक्रमक झाले. याबाबत चौकशी ळाल्याचे करू, अशी उत्तरे मि या तरुणांनी सांगितले. यानंतर त्यांनी थेट म बईच्या पाल निमल वेल्फेअर फाउंडेशान या संघटनेकडे तक्रार या करत प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR