मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर हा महिन्याभरापासून फरारी होती. कोल्हापूर पोलीस त्याचा नागपूरसह चंद्रपूरमध्ये तपास करत होती. कोरटकर हा दुबईत असल्याचे बोलले जात होते. अखेर कोरटकरला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. कोरटकरला तेलंगणातून ताब्यात घेण्यात आले आहे.