लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकिय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधानसभा विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि.२० मे रोजी सायंकाळी लातूर शहरानजीकच्या अंबाजोगाई रोडवरील कार्निवल रिसॉर्ट येथे आयोजित लातूर शहरातील नंदकिशोर ईंद्राज अग्रवाल यांच्या मे.सीताराम ईंद्राज अग्रवाल या फर्मच्या शताब्दी समारोह कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड.किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन अॅड.समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, राजेसाहेब सवई, विष्णू धायगुडे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, अग्रवाल कुटुंबीय, मित्रपरिवार उपस्थित होते.