25.4 C
Latur
Saturday, February 15, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरअजितदादा वक्तशिर माणूस

अजितदादा वक्तशिर माणूस

बीड : मी काही अजित पवारांना वेळ मागितली नाही. मी काल नव्हे, तर परवा वेळ मागितली होती. अजित दादा वक्तशिर आहेत, मलाच त्यांच्याकडे जाता आले नाही. तसेच मी अद्यापही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न हा त्यांचा पक्ष घेईल.

सुरेश धस बीडचे पालकमंत्री असणा-या अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या कारकिर्दीतील म्हणजे २०१९ ते २०२४ पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांच्या चौकशीची मागणी करणार होते. पण अजित पवारांनी धस यांना भेटीची वेळ देण्यात आली नाही. त्यामुळे अजित पवारांनी धस यांना भेटणे टाळले का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

पुढे संतोष देशमुख प्रकरणावर बोलताना सुरेश धस म्हणाले, आकाचे सर्व सहकारी आणि ज्यांनी ज्यांनी संतोष देशमुखला मारले आहे ते जोपर्यंत फासावर जात नाहीत तोपर्यंत ही लढाई सुरू राहणार आहे. तसेच अचानक बॉम्ब फोडून उपयोग नसतो. मी ७३ कोटींचा बॉम्ब फोडला होता, त्याचा आता परिणाम होताना दिसत आहे. रात्रीतून आता रस्ते तयार व्हायला सुरू झाले आहे. आता पुढचा बॉम्ब फोडण्यापूर्वी अभ्यास करावा लागतो, माझा अभ्यास सुरू आहे.

तसेच पुढे बोलताना सुरेश धस यांनी सीडीआर तपासणीची देखील मागणी केली आहे. जे काही सहआरोपी आहेत, अजून बरेच सहआरोपी आहेत, त्यांच्या सीडीआर तपासायला पाहिजे, याची मागणी आम्ही करणार आहोत. महादेव मुंडे यांचे सौभाग्यवती यांना उपोषणाला बसू देऊ नये, आता सोळावा महिना सुरू झाला आहे आणि अद्यापही कारवाई झालेली नाही. सुदर्शन घुले सारखे आरोपी यांचे अनेक व्हिडिओ मिळतील ते शोधून काढले पाहिजेत असेही सुरेश धस म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR