अडीच एकरात ३५ दिवसांत शेतक-याला मिळाले ६.७१ लाख!

सुभाष कदम
धाराशिव : धाराशिव तालुक्यातील खेड येथील शेतकरी विनोद भागवत टिकले यांना अडीच एकरांतील कोथिंबीर पिकाने ६ लाख ७१ हजार रूपये दिले. यासाठी त्यांना लागवडीपासून काढणीपर्यंत ४५ हजारांचा खर्च आला. खर्च वजा जाता त्यांना निव्वळ ६ लाख २६ हजारांचा नफा झाला. शेतकरी उन्हाळ््यात कमी कालावधीत निघणा-या कोथिंबिरीचे पीक घेतो. अनेकदा भाव पडतात, तेव्हा खर्च पाण्यात जातो. परंतु जेव्हा चांगला दर मिळतो, तेव्हा शेतक-याला लॉटरी लागते. धाराशिव तालुक्यातील या शेतक-याला एका अर्थाने लॉटरीच लागली आहे.

कोथिंबीर हे अवघ्या ३५ दिवसांत काढणीला येणारे पीक… एकरी १८ ते २० हजारांचा खर्च… चांगला भाव मिळाला तर तो शेतकरी लखपती झालाच म्हणून समजा. त्यामुळे अलिकडच्या पाच-सहा वर्षांत धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकरी कोथिंबीर या मसालावर्गीय पिकाकडे वळले आहेत. कोथिंबिरीची लागवड, पाणी देण्याची पद्धत यामध्ये आधुनिकता आल्याने व उत्पादन मोठ्या प्रमाणात निघत असल्याने हे पीक शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या परवडत आहे. कोथिंबीर खरेदी करणारे व्यापारी थेट बांधावर येऊन खरेदी करतात. या पिकाची काढणी व्यापारी स्वत: मजूर आणून करतात. तसेच बांधावर ठरलेले पैसे शेतक-यांना देतात. त्यामुळे अनेक शेतकरी अन्य पारंपरिक पिकांना फाटा देत कोथिबींर पिकाला प्राधान्य देत आहेत.

खेडचे शेतकरी विनोद भागवत टिकले यांनी दि. १८ मार्च २०२६ रोजी अडीच एकरात कोथिबिरीची (धने) पेरणी केली. आवश्यक असणारे खत पेरतानाच दिले. रेन पाईप व मिनी स्प्रींक्लरच्या सहाय्याने पिकाला पाणी दिले. धने उगवल्यानंतर खुरपणी केली. दोन फवारणी केल्या. यासाठी त्यांना ४५ हजार रुपये खर्च आला. ३५ दिवसांनंतर पीक काढणीला आल्यानंतर पळसवाडी (ता. धाराशिव) येथील व्यापारी अप्पा शिंदे यांनी थेट बांधावर येऊन अडीच एकरांतील कोथिंबिरीचा फड ६ लाख ७१ हजार रुपयांना खरेदी केला. खर्च वजा जाता विनोद टिकले यांना अडीच एकरांतून ६ लाख २६ हजारांचा नफा झाला.

कोथिंबीर पिकाने
कायापालट झाला
खेड येथील शेतकरी विनोद भागवत टिकले हे प्रयोगशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. यंदा विनोद टिकले यांनी चारवेळा एकरभर कोथिंबिरीची पेरणी केली. त्यांना तीनवेळा बरा दर मिळाला. यातून त्यांना सव्वातीन लाख रूपये मिळाले. उन्हाळी हंगाम असल्याने चौथ्यावेळी त्यांना चांगला दर मिळाल्याने अडीच एकरातून ६ लाख ७१ हजार रुपये मिळाले. कोथिंबीर पिकाने त्यांचा कायापालट केला असल्याचे विनोद टिकले यांनी सांगितले.

अनेक गावे झाली
आर्थिकदृष्टया समृद्ध
गेल्या पाच-सहा वर्षापासून धाराशिव जिल्ह्यात कोथिंबीर पिकाची लागवड वाढली. कोथिंबीर खरेदी करणारे व्यापारी ही गावोगावी तयार झाले आहेत. हे व्यापारी मुंबई, पुणे, नागपूर, बेंगलोर यासारख्या मोठ्या महानगरात कोथिंबीर पाठवितात. त्यांच्याकडे काढणीसाठी मजुरांची यंत्रणा आहे. कोथिंबीर हे नाजूक पीक असल्याने वेळेत काढणी व बाजारपेठेत वेळत दाखल होणे गरजेचे असते. ज्या शेतक-यांना कोथिंबीर पिकाचे गणित समजले ते शेतकरी नेहमी हे पीक घेऊन आर्थिक समृद्ध झाले आहेत. परिणामी अनेक गावेही समृद्ध झाली आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36
Video thumbnail
Latur|एकमत कार्यालयात गणरायाची आरती; माऊली शिक्षण संस्थेचे गंगाधर आराडले यांची उपस्थिती
02:52
Video thumbnail
Latur|संजीव सोनवणे प्रकरणात मोठी अपडेट! सुसाईड नोटची होणार तपासणी | DYSP समीरसिंह साळवे
02:37
Video thumbnail
AUSA ANDOLAN |लातूरसह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा! औशात हजारो महिला रस्त्यावर
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! संजीव सोनवणे यांच्या मृत्यूप्रकरणी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
03:31
Video thumbnail
Latur|औशातून दुष्काळाचा एल्गार! तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे ठिय्या आंदोलन
05:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी गोळी झाडून केली आत्महत्या...
01:01
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54

Latest news