जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात तिरू नदीच्या पाण्याने थैमान घातले असून तालुक्यातील अनेक गावांमध्ये तीरू नदीचे पाणी शिरले आहे. जळकोट तालुक्यातील बोरगाव येथील प्रसिद्ध असलेले ब्रह्मदेवाचे मंदिर पहिल्यांदाच पाण्यात बुडालेले आहे. बोरगाव गावापर्यंत पाणी पोहोचलेली आहे यासोबतच जळकोट तालुक्यात पंचायत समिती गण असलेल्या अतनुर गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. यासोबतच तब्बल २५ वर्षानंतर तिरूका गावामध्ये हनुमान मंदिर परिसरामध्ये पाणी शिरले आहे. यामुळे गावक-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आकाशा मधून प्रचंड पाऊस कोसळल्यामुळे, तसेच हळी हंडरगुळी येथील धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे प्रचंड पूर आलेला आहे. न भूतो न भविष्य असाच पूर आलेला आहे. हा पूर पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली आहे.