31.5 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeलातूरअतिक्रमणबधित छोट्या व्यापा-यांचे पुनर्वसन करणार

अतिक्रमणबधित छोट्या व्यापा-यांचे पुनर्वसन करणार

औसा : प्रतिनिधी
अतिक्रमणे काढताना प्रशासनाने बाधित नागरिकांचे पुनर्वसन कसे करता येईल याचाही विचार करणे गरजेचे असून शहरवासीयांना अडचण होणार नाही अशा जागा चिन्हांकित करून नगरपालिका प्रशासनाने या छोट्या व्यापा-यांंना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच औसा शहरातील अतिक्रमण बधित छोट्या व्यापा-यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केले.
औसा येथील (दि.८) रोजीच्या या बैठकीदरम्यान आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रशासकीय अधिका-यांचे तसेच अतिक्रमणमुक्त औसा अभियानामुळे बाधित झालेल्या लहान-मोठ्या व्यापा-यांंचे म्हणणे ऐकून घेत आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, औसा शहराची लोकसंख्या ५० हजारांच्या वर गेली आहे. शाळा, कॉलेज, शासकीय काम व खरेदी- विक्री आदी कारणांसाठी शहरात दररोज येणा-या नागरिकांची संख्याही मोठी आहे. शहर अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्याने या हजारो नागरिकांना, वाहनचालकांना दररोज त्रास होत होता. शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी शहर प्रशासनाच्या वतीने शहरात सध्या अतिक्रमणे काढण्यासाठी मोहीम राबविली जात आहे.
प्रशासकीय यंत्रणा त्यांचे काम करीत आहे, नियमाच्या अधीन राहून केल्या जाणा-या कुठल्याही कारवाईच्या आड मी येणार नाही पण या कारवाईमुळे काही कुटुंबांपुढे अडचणी निर्माण झाल्या असून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही हे सुिनश्चित करणेही माझेच कर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेतून  औसा शहरातील फळ विक्रते, भाजी विक्रते, मांस विक्रते, गट्टेवाले, पट्टेवाले व पथविक्रेते आणि प्रशासन यांची बैठक घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या शहराचे रुपडे पालटायचे असेल तर शासन, प्रशासन व नागरिकांना एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. असे ते म्हणाले. या बैठकीला माजी नगराध्यक्ष किरण उटगे, सुनील उटगे, जयराज कसबे, बंडू कोद्रे, लहू कांबळे, सदानंद शेटे, नगरपालिका मुख्याधिकारी अजिंंक्य रणदिवे,  सोनाली गुळबिले, अंगदराव कांबळे, गोपाळ धानुरे, अक्रम पठाण,  अस्लम पठाण, व व्यापारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR