चाकूर : अ. ना. शिंदे
तालुक्यात ६६ हजार हेक्टर्स वरील पिंकाचे नुकसान जवळपास प्रत्येक गावात घरांची पडझड झाली आहे. अतिवृष्टीने शेतक-यांचा कणा मोडला असून स्वप्नं वाहून गेली आहेत. या आठवड्यातील मुसळधार पावसाने दाणादाण उडाली असूनउ नदी नाल्या तुडुंब भरून वाहील्या अनेक गावांत पाणीच पाणी झाले तर जनजीवन विस्कळीत झाले. तालूक्यातील कांही मार्ग बंद झाले असून या अतिवृष्टीन तालुक्यात सर्वच खरीपातील पीके पाण्यांखाली गेली आहेत.
तालुक्यात जवळपास ६६ हजार हेक्टर्स पेक्षा जास्त जमीनीवरील खरीप पिंकाचे नुकसान झाले असून जवळपास प्रत्येक गावातील घरांची पडझड झालेली आहे. तालुक्यातील ८१ गावातील ५४ हजार ९०३ शेतकरी असून ,६६ हजार ४३१ हेक्टर्सवर खरीपाची पेरणी झालेली आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे अॅप द्वारे ई-पीक पाहाणी करणे आवश्यक असून शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई, पीकविमा, पीक कर्ज, विविध शासकिय योजनांचा लाभ यासाठी ई-पीक पाहाणी आवश्यक आहे. या आठवडातील संततधार आणि मुसळधार पावसामुळे सर्वत्र दाणादान झाली त्यामुळे प्राथमीक अंदाजानुसार ६६ हजार हेक्टर्स वरील खरीपाची पीके वाया गेलेली पाहायला मिळत आहेत.
तालुक्यातील सर्व बंधारे, पाझर तलाव,नदी, नाले ओसंडून वाहिले आहेत. आतापर्यंत ९८१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तालुक्यातील सर्व ओढे, नद्या काठच्या शेतीचे पंचनामे करण्यात यावेत, घरणी नदी काठावरील जमिनी पाण्याखाली गेल्याने घरणी येथील शेतक-यांच्या जमीनी वरील खरीपाची पिके पाण्याखाली गेली तसेच मातीची वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी घरणी शिवारातील नदीकाठी असलेल्या शेतक-यांच्या शेताचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.