25.9 C
Latur
Tuesday, January 14, 2025
Homeलातूरअतिवृष्टीमुळे पीक नुकसानीच्या अनुदानाची प्रतिक्षा

अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीच्या अनुदानाची प्रतिक्षा

रेणापूर :  प्रतिनिधी
तालुक्यात सततच्या पावसाने व सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह खरीपाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. याची दखल घेऊन शासनाने  शेतक-यांना नुकसान भरपाईचे अनुदान मंजूर केले मात्र अद्यापही बहुतांश शेतक-यांना अनुदान मिळाले नाही तेंव्हा तात्काळ अनुदान देण्यात यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन येथील रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे  संचालक मंडळाच्या वतीने सोमवारी दि १३ जानेवारी रोजी तहसीलदार यांना देण्यात आले .
रेणापूर तालुक्यात पावसळा सुरु झाल्यापासून सातत्याने  पाऊस पडला शेतक-यांनी  सोयाबिन पिकांसह मुग, उडीद तूर अन्य खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. वेळेवर पाऊस झाल्याने पिकेही बहरली गेली आहेत. त्यातच ३० ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२४ पर्यंत तालुक्यात ब-याच ठिकाणी अतिवृष्टी होऊन हातातोंडाशी आलेले सोयाबीन व अन्य खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. याची दखल घेऊन व नुकसानीचे पंचनामे करून शासनाने अनुदान ही मंजूर केले होते मात्र अद्यापही केवायसीचे  कारण देत अनेक शेतक-याच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आले नाही  तसेच तालुक्यात जवळपास २५०० शेतक -यांची  केवायसी झाली नाही तेंव्हा अशा शेतक-याची तलाठी यांच्या मार्फत केवायसी पूर्ण करून घ्यावी व त्यांच्या खात्यावर अनुदान जमा करावे त्याबरोबरच अनेक शेतक-यांनी केवायासी प्रक्रिया पूर्ण  केली मात्र त्यांना ही अद्याप अनुदान मिळाले नाही अशा शेतक-यांंना तात्काळ अनुदान वितरित करण्यात यावे,
 गेल्या एक वर्षापासून कृषी विभागाकडून अनुदान तत्वावर ठिबक सिंचन, शेती आवाजारे तसेच ई-पीक पहाणी प्रोत्साहन सामाईक क्षेत्राचे अद्यापही अनुदान देण्यात आले नाही हेही अनुदान देण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या वतीने सोमवारी दि १३ जानेवारी रोजी तहसीलदार यांना देण्यात आले. या निवेदनावर उमाकांत खलंग्रे, अ‍ॅड. शेषेराव हाके संचालक जनार्दन माने , प्रकाश सूर्यवंशी, प्रवीण माने, विश्वनाथ कागले, अ‍ॅड. एम .पी. पडोळे, बाळासाहेब खटाळ , राजाभाऊ साळुंके यांच्यासह गोविंद राव नागरगोजे, तात्याराव वाघमारे, रंगनाथ कणसे , विकास होळंबे स्वाक्ष-या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR