27.2 C
Latur
Tuesday, July 22, 2025
Homeलातूरअत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्य घटना

अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्य घटना

लातूर : प्रतिनिधी
लोकशाही मार्गाने आंदोलन करुन जनतेच्या भावना प्रतिकात्मक पद्धतीने व्यक्त करणा-या छावा संघटनेच्या पदाधिका-यांना सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी बेदम मारहान करण्याची लातुरात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून आम्ही या घटेनेचा तीव्र शब्दांत निषेध करीत असल्याचे सांगून मारहान करणा-यांना त्वरीत अटक करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री, तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.
या संदर्भाने बोलतांना आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे, महाराष्ट्रातील शेतक-यांबद्दल असंवेदनशील वक्तव्य करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत कामकाज चालू असताना ऑनलाइन रमी जुगार खेळत असल्याचे चित्र प्रसिद्ध झाले आहे. अशावेळी जनतेमध्ये प्रक्षोभनिर्माण होणे स्वभाविक आहे. लातूरमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आलेले असताना छावा संघटनेच्या पदाधिका-यांनी त्यांना निवेदन आणि पत्ते  दिले. खरे तर संतापलेल्या जनतेच्या प्रतिक्रियेची ही एक प्रतीकात्मक कृती होती,
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मात्र, छावा संघटनेचे प्रांतअध्यक्ष विजयकुमार घाडगे-पाटील व इतर पदाधिकारी यांना बेदम मारहाण केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन केलेली ही मारहान निषेधार्यच आणि लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. लोकशाहीच मंदीर म्हणून ओळख असलेल्या विधानभवनात नुकतीच हाणामारीची घटना घडली. त्यातून कोणताही बोध न घेता. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लातूरमध्ये हा प्रकार घडवून आणला आहे. यावरून विद्यमान सरकार आणि सत्ताधारी मंडळीची मानसीकता ही उघड झाली आहे, असेही आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.
सदरील घटना लातूरच्या संस्कृतीला तर अजिबात शोभणारी नसल्याचे नमूद करुन पून्हा येथे, असे प्रकार घडू नयेत यासाठी  मारहाण करणा-या या कार्यकर्त्यावर कडक कारवाई करावी, यानिमित्ताने राज्यात किमान कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे, याचा पुरावा शासनाने द्यावा, अशीही मागणी आमदार अमित देशमुख यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR