31 C
Latur
Tuesday, March 4, 2025
Homeमहाराष्ट्र‘अथर्व स्कूल ऑफ बिझनेस’च्या विद्यार्थ्यांचा फ्रान्स, बेल्जियम अभ्यास दौरा

‘अथर्व स्कूल ऑफ बिझनेस’च्या विद्यार्थ्यांचा फ्रान्स, बेल्जियम अभ्यास दौरा

मुंबई : प्रतिनिधी
अथर्व ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मुंबईच्या अथर्व स्कूल ऑफ बिझनेसने जागतिक व्यवसाय ज्ञानाचा अनुभव देण्यासाठी पीजीडीएम विद्यार्थ्यांसाठी फ्रान्स व बेल्जियम येथे अभ्यास दौरा आयोजित केला. कार्याध्यक्ष श्री. सुनील राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. सुनील राणे यांनी विद्यार्थ्यांसोबत एक अर्थपूर्ण संवाद साधला, ज्यामध्ये जागतिक व्यवस्थापनाचे महत्त्व, कौशल्य व भारत आणि फ्रान्स या देशांमधील विविध सामंजस्य करारांबाबत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सहभागाची गरज यावर भर दिला.

विद्यार्थ्यांनी वित्त, तंत्रज्ञान आणि लक्झरी गुड्ससारख्या प्रमुख उद्योगांशी संवाद साधला. स्टार्टअप्स, मल्टिनॅशनल कंपन्या आणि उद्योजकांसोबत चर्चांमधून त्यांना जागतिक व्यवसाय ट्रेंड व सर्वोत्तम व्यवस्थापन पद्धतींची प्रत्यक्ष माहिती मिळाली. तसेच, उद्योगभेटी, नेटवर्किंग सत्रे आणि ज्ञानवर्धन उपक्रमांनी त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील समज अधिक दृढ केली.

आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक दृष्टिकोन मिळावा यासाठी अशा अभ्यास दौ-यांचे आयोजन महत्त्वाचे आहे. हा दौरा त्यांच्या व्यावसायिक क्षमतेत मोठी भर घालणारा ठरला. पीजीडीएम हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यास सक्षम आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR