26.7 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeमनोरंजनअनिल कपूर ‘नो एन्ट्री’ च्या सिक्वेल मधून बाहेर

अनिल कपूर ‘नो एन्ट्री’ च्या सिक्वेल मधून बाहेर

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘नो एंट्री’ या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रेक्षक ब-याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. दरम्यान या चित्रपटाबद्दल मोठी बातमी समोर आली असून, नो एंट्रीच्या सिक्वेलमध्ये अनिक कपूरला एंट्री देण्यात आली नाही, यामुळे अनिल कपूर आपला मोठा भाऊ आणि निमार्ता बोनी कपूर यांच्यावर नाराज आहे. नो एंट्रीमध्ये सलमान खान, अनिल कपूर, फरदीन खान, ईशा देओल, लारा दत्ता, बिपाशा बसू आणि सेलिना जेटली यांनी काम केले होते. मात्र, सिक्वेलमध्ये स्टारकास्ट मध्ये बदल करण्यात आला आहे.

निर्माता बोनी कपूरने सांगितले की, अनिल कपूरला नो एन्ट्रीच्या सीक्वलमध्ये काम करायचे होते, मात्र त्याला या चित्रपटात स्थान मिळाले नाही. नो एंट्री २ च्या कास्टिंगच्या बातम्या समोर आल्यानंतर अनिल समजले की त्याला या चित्रपटात कास्ट केले नाही, तेंव्हापासून तो माज्याशी नीट बोलत नाही, असे बोनी म्हणाला. नो एंट्रीच्या सिक्वेलमध्ये अभिनेता वरूण धवन, दिलजीत दोसां आणि अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

ती नव्या कलाकाराची निवड केलेली आहे हे त्याला सांगायच्या आधीच तो चिडला कारण ही बातमी लीक झाली होती आणि त्याला या चित्रपटात घेण्यात आले नाही हे कळाले होते मिळालेल्या माहितीनुसार, नो एंट्रीचा सिक्वेल २०२५ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. यादरम्यान हा चित्रपट २० वर्षे पूर्ण करेल. नो एन्ट्रीचा पहिला भाग २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR