33.2 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमनोरंजन८ एप्रिलला येणार ‘पुष्पा २’ चा टीझर

८ एप्रिलला येणार ‘पुष्पा २’ चा टीझर

मुंबई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून साथ दिल्यानंतर लोक त्याच्या सीक्वलची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावर्षीच्या मोस्ट अवेटेड चित्रपटांमध्ये पुष्पा द रुलच्या नावाचाही समावेश आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाचे अलीकडेच एक मोठे अपडेट समोर आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निर्माते या चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत.

अल्लू अर्जुनचा वाढदिवस ८ एप्रिल रोजी आहे. यामुळे या चित्रपटाचा टीझर ८ एप्रिलला प्रदर्शित करून चाहत्यांना मोठी भेठ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याची अधिकृतपणे पुष्टी झाली नाही.गेल्या वर्षी पुष्पा २ मधील अल्लू अर्जुनचे फर्स्ट लूक पोस्टर देखील रिलीज करण्यात आले होते. यामध्ये अभिनेता साडी नेसलेला दिसत होता. त्याचा चेहरा निळा आणि लाल रंगात रंगला होता. २०२१ मध्ये रिलीज झालेला पुष्पा द राइजला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता.

कॅमिओ रोलमध्ये या स्टार्सच्या नावांची चर्चा
दरम्यान , पुष्पा द राइज कोरोना काळात प्रदर्शित होऊनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. कोरोनाच्या काळात सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटांपैकी हा एक होता. पुष्पा २ मध्ये प्रेक्षकांना सुखद धक्के देण्यासाठी निर्मार्त्यांनी जोरदार तयारी केली असून, समंथा रुथ प्रभू आणि संजय दत्तची कॅमिओ रोलमध्ये या चित्रपटात झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR